Osmanabad, Farmer, Crop Insurance
Osmanabad, Farmer, Crop Insurance saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance : आवाज काेणाचा... उद्धव साहेब तुम आगे बढाे ! विमा कंपनी कार्यालय फाेडले, कर्मचा-यांना फासले काळे

साम न्यूज नेटवर्क

- कैलास चाैधरी

Osmanabad News : पिक विमा कंपनीच्या (crop insurance company) विरोधात जनहित शेतकरी संघटना आणि शिवसेनेचा ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. आज (मंगळवार) दोन्ही संघटनांकडून उस्मानाबाद (osmanabad) येथे विमा कंपनीच्या कार्यालयाची अक्षरशः तोडफोड करण्यात आली. तसेच या कंपनीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळ फासण्यात आलं.

मागील तीन वर्षापासून पिक विमा कंपनी शेतकऱ्यांना (farmers) पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत आहे. त्यामुळे आक्रमक होऊन संघटनांनी कंपनीचे कार्यालय फोडून टाळे ठोकले आहे. 2020 वर्षापासून सलग तीन वर्षाचा पिक विमा न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. (Maharashtra News)

गेल्या काही दिवसांपूर्वीच उस्मानाबाद कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांनी पिक विमा लवकरात लवकर मिळाला नाही तर मोठे आंदोलन करणार असा इशारा देखील कंपनीला दिला होता. दरम्यान आज जनहित शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून प्रधानमंत्री पिक विमा (crop insurance) योजनेच्या ऑफिसवर येऊन ऑफिसच्या बोर्डाची आणि खुर्च्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. त्याचबरोबर पिक विमा कंपनीच्या ऑफिसला टाळे देखील ठोकले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharif Crop Loan : खरीप हंगामासाठी पीक कर्ज; शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी टोल फ्री क्रमांकाची सुविधा

Live Breaking News : रत्नागिरी-सिंधुदुर्गात सकाळी ९ वाजेपर्यंत 8.17 टक्के मतदान

IPL Playoffs Scenario: मुंबईच्या विजयाने हैदराबादचं टेन्शन वाढलं! तर या संघांचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा

Riteish Deshmukh Voting | जेनेलिया आणि रितेश देशमुख मतदानासाठी दाखल

Dhule Crime : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात एलसीबीची माेठी कारवाई, 55 लाखांची रोकड जप्त; तिघांना घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT