Latur Talathi News : ३५ लाखांची संपत्ती आली काेठून? ACB चौकशीत तलाठ्याला उत्तर देता येईना

तलाठ्याकडे उत्पन्नापेक्षा ९८.६४ टक्के जादा मालमत्ता असल्याचे उघडकीस आले.
latur, talathi, acb
latur, talathi, acbsaam tv

Latur News : लातूर (Latur) जिल्ह्यातील उदगीर (Udgir) तालुक्यातील बोरगाव (बु.), कोदळी येथे कार्यरत तलाठ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) वतीने करण्यात आलेल्या उघड चौकशीत बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. दरम्यान याबाबत जळकोट पोलिस (Police) ठाण्यात तलाठ्यासह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे (Maharashtra News)

latur, talathi, acb
Latur News : लातूरकरांनाे ! पाणी जपून वापरा, पूरवठा राहणार बंद

ज्ञानोबा हणमंतराव करमले हा सध्या उदगीर तालुक्यातील बोरगाव (बु), कोदळी येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे. १० ऑक्टोबर २०१२ ते ३१ ऑगस्ट २०२० या काळात बेहिशेबी मालमत्ता जमविल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (acb) करमले बाबतची तक्रार करण्यात आली होती.

latur, talathi, acb
Sangli News : अमर रहे... अमर रहे... नायब सुभेदार जयसिंग भगत अमर रहे... खानापूरात शाेककळा

या तक्रारीची पडताळणी करून सत्यता बघून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठी ज्ञानोबा करमले यांच्यावर सापळा लावून ३० ऑगस्ट २०२० रोजी छापा मारला. यावेळी मालमत्तेची उघड चौकशी करण्यात आली. यामध्ये त्याने नोकरीच्या काळात बेकायदेशीररीत्या प्राप्त असलेल्या उत्पन्नाच्या तुलनेत त्यांच्याकडे आढळून आलेल्या अधिक मालमत्तेबाबत ते समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत.

९८.६४ टक्के जादा मालमत्ता

एकंदरीत परीक्षण कालावधीदरम्यान तलाठ्याने (talathi) ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत ३४ लाख ७५ हजार ८८६ रुपयांची (९८.६४ टक्के) ची अपसंपदा संपादित केल्याची निष्पन्न झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com