farmer successfully grows apple in palkhed near nashik saam tv
ऍग्रो वन

Success Story : काेराेना काळात नाेकरी गेली, पठ्ठ्याने हार न मानता द्राक्षच्या पंढरीत फुलवली सफरचंदाची बाग

हिमालयीन शिमला अँना या जातीचे सफरचंदाची 30 झाडे आणून लागवड केली. याला आतापर्यंत शंभर रुपये एक झाडा याप्रमाणे तीन हजार रुपये खर्च आला.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Nashik News :

अवकाळी, गारपीटीचा दर वर्षी द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील गावांना तडाखा बसतो म्हणून काही तरी वेगळा शेती प्रयोग करावा म्हणून निफाड तालुक्यातील पालखेड येथील शेतकरी भरत बोलीज यांनी सफरचंदाची लागवड केली. या झाडांना फळ आल्याने हा वेगळा प्रयोग यशस्वी झाला आहे. (Maharashtra News)

निफाड तालुक्यातील पालखेड येथील साहेबराव बोलीज यांचा मुलगा भरत बोलीज हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे प्राध्यापक म्हणून कामकाज करत होते. काेराेना काळात त्यांची नाेकरी गेली. नाेकरी गेल्याने आता काय करावे असा भरत यांच्यापूढे प्रश्न उभा राहिला.

वडिलोपार्जित शेती करावी पण अवकाळी, गारपीटीचा दर वर्षी तडाखा बसत असल्याने द्राक्ष बागेची नुकसान होते आणि लाखोंचा खर्च वाया जातो. यामुळे मग काही तरी शेती वेगळा प्रयोग करावा अशी मनात कल्पना आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यांनी हिमालयीन शिमला अँना या जातीचे सफरचंदाची 30 झाडे आणून लागवड केली. मार्च 2023 मध्ये लागवड केली. याला आतापर्यंत शंभर रुपये एक झाडा याप्रमाणे तीन हजार रुपये खर्च आला.

या झाडांवर सफरचंदचे फळे आली असून यांची हर्वेस्टिंग एप्रिल, मे महिन्यात सुरु होणार असल्याने जम्मू काश्मीर अगोदर येथील सफरचंद बाजार दाखल होणार असल्याचे शेतकरी भरत बोलीज यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT