Dhule Sakri News Saam tv
ऍग्रो वन

Sakri News : अवकाळीचा धसका; रात्री पाऊस पाहतच उचलले शेतकऱ्याने टोकाचे पाऊल

Dhule News : उन्हाळी कांदा अवकाळी पावसात खराब झाला होता. गेल्या वर्षी अवकाळीने फटका बसल्यामुळे पुन्हा अवकाळी पावसाला सुरवात झाली

साम टिव्ही ब्युरो

पिंपळनेर (धुळे) : मागील दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुकें पिकांचे पुन्हा नुकसान होणार याचा धसका घेऊन चिकसे (ता. साक्री) येथील (Farmer) शेतकरी हिंमत झिप्रा खैरनार (वय ४२) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर (Dhule) घटना सोमवारी (२७ नोव्हेंबर) पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आली. (Tajya Batmya)

हिंमत खैरनार अल्पभूधारक शेतकरी होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कुटुंबातील सर्व मोलमजुरी करत होते. आईचे आजारपण, मोठी मुलगी लग्नाची आहे. तसेच त्यांच्यावर हात उसनवारीचे दोन ते अडीच लाख रुपये कर्ज होते. उन्हाळी कांदा अवकाळी पावसात खराब झाला होता. गेल्या वर्षी अवकाळीने फटका बसल्यामुळे पुन्हा अवकाळी पावसाला सुरवात झाली. यात आपले पुन्हा नुकसान होणार या चिंतेत ते होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पत्नीशी शेवटचा संवाद 

शेतात कच्च्या भिंती व पत्रा असलेल्या घरात राहणारे खैरनार अवकाळी पाऊस सुरू झाल्यानंतर मनाची चलबिचल होऊ लागल्याने घरात आणि बाहेर अस्वस्थपणे येरझारा घालत होते. दरम्यान दुपारी तीन वाजेच्या सुमारास पाऊस सुरु झाला तो रात्रीही बंद झाला नाही. घरात असताना पत्नीशी बोलताना हिंमत खैरनार हे ‘हा पाऊस आपले आणखी नुकसान करणार’ असे म्हणत होते. रात्री उशिरा पत्नी व मुले झोपी गेल्यानंतरही ते बरसणारा पाऊस पाहत बाहेर बसले. दरम्यान रात्री दोन ते अडीचच्या सुमारास पत्नी सरलाबाई यांना पती घरात दिसले नाही; म्हणून त्या घराबाहेर गेल्या असता ते जवळच्या आंब्याच्या झाडाला फास लावून लटकलेले दिसले. त्यांनी कुटुंबीयांना आरडाओरड करून झोपेतून जागे करत शेजाऱ्यांना फोन करून घटनेची माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT