Ravikant Tupkar: मंत्रालयाचा ताबा घेण्यासाठी शेकडाे शेतक-यांसमवेत रविकांत तुपकर मुंबईला रवाना (पाहा व्हिडिओ)

रविकांत तुपकर यांचे आंदाेलन राेखण्यासाठी पाेलीसांनी नियाेजन केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
ravikant tupkar left to mumbai for andolan at mantralaya from buldhana
ravikant tupkar left to mumbai for andolan at mantralaya from buldhanasaam tv
Published On

Ravikant Tupkar :

कापसाला व सोयाबीनला योग्य हमी भाव मिळावा तसेच शेतक-यांचे अन्य प्रश्न सुटावेत यासाठी उद्या (ता. 29 नोव्हेंबर) लाखो शेतक-यांसमवेत मंत्रालयाचा ताबा घेणार अशी गर्जना केलेले शेतकरी नेत रविकांत तुपकर (ravikant tupkar latest marathi news) हे आज (मंगळवार) बुलढाणा जिल्ह्यातून मुंबईस रवाना झाले. सोमठाणा येथून तुपकरांसमवेत शेकडो शेतकरी गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईकडे कूच करीत आहे. (Maharashtra News)

सोमठाणा येथे रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु हाेते. सकाळी अकराच्या सुमारास ते सोमठाणा येथून बुलढाणा मार्गे मुंबईस निघाले. त्यापूर्वी त्यांना गावातील शेतक-यांनी तसेच ग्रामस्थांनी घाेषणाबाजी करुन मुंबईतील आंदाेलनास शुभेच्छा दिल्या.

ravikant tupkar left to mumbai for andolan at mantralaya from buldhana
Unseasonal Rain Hits Nashik: ७२ तासांच्या आत संपर्क साधा, नुकसानग्रस्त भागातील शेतक-यांना कृषी विभागाचे आवाहन; जाणून घ्या टोल फ्री क्रमांक

रविकांत तुपकरांचा असा असणार दाैरा

बुलढाणा -सिल्लोड - संभाजीनगर - नगर - चाकण मार्गे लोणावळा. लाेणावळा येथे रविकांत तुपकर हे आज (मंगळवार) मुक्कामी असतील. उद्या (ता. २९) सकाळी तुपकर शेतक-यांसमवेत मुंबईतील मंत्रालयाकडे कूच करतील.

रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खाेत (sadabhau khot), सप्त खंजेरी वादक सत्यपालं महाराज यांच्यासह अनेकांनी रविकांत तुपकर यांच्या अन्यत्याग आंदोलन स्थळी भेट देत त्यांच्या आंदाेलनास पाठिंबा दिला.

Edited By : Siddharth Latkar

ravikant tupkar left to mumbai for andolan at mantralaya from buldhana
Kokan Poltitics: चर्चा तर हाेणारच! 'ओम गणेश' वर दीपक केसरकर; तब्बल 12 वर्षानंतर नारायण राणेंची घेतली भेट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com