Farmer Saam tv
ऍग्रो वन

Dhule: शेतकऱ्यांचा लाँग मार्च; रणरणत्या उन्हात शिरपूर ते धुळे पायपीट

शेतकऱ्यांचा लाँग मार्च; रणरणत्या उन्हात शिरपूर ते धुळे पायपीट

भूषण अहिरे

धुळे : वन जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे सातबारा उतारा करण्यात यावा; या मागणीसाठी किसान सभा व फायटर्स ग्रुपच्यावतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिरपूर तालुक्यातील सांगवी येथून शनिवार सकाळपासून हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांचा (Farmer) पायी मोर्चा धुळ्याच्या दिशेने काढण्यात आला आहे. रात्री हा मोर्चा शिरपूर (Shirpur) येथे मुक्काम केल्यानंतर धुळ्याच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. (dhule news Long march of farmers Shirpur to Dhule)

महाराष्ट्र किसान सभा, शेतमजूर युनियन, शेतकरी संघटना व बिरसा फायटर्स संघटनेतर्फे शिरपूर ते धुळे (Dhule) लाँग मार्च काढण्यात आला. अतिक्रमित वनजमिनीचे प्रमाणपत्र मिळालेल्या; परंतु सातबारापासून वंचित राहिलेल्या शिरपूर तालुक्यातील ११ हजारांवर शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. शनिवारी सांगवी येथील बोराडी गाव फाट्यावर शेतकरी एकत्र आले. महिलांची संख्याही लक्षणीय होती.

उद्या धुळे जिल्‍हाधिकारी कार्यालयावर धडकणार

रात्री हा मोर्चा कापडणे येथे पोहोचणार असून त्या ठिकाणी मुक्काम करून सकाळी पुन्हा धुळे शहराकडे शेतकरी मार्गस्थ होणार आहे. उद्या धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर (Dhule Collector Office) मोर्चा धडकणार आहे. तर याबाबत धुळे जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भातील निवेदन पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे देण्यात येणार असल्याचे मोर्चाकर्त्यांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवार बारामतीमधून १५०० मतांनी आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT