ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्ही नॉन व्हेज प्रेमी असाल आणि श्रावण असल्यामुळे चिकन, मटण खाता येत नसेल तर ही झणझणीत रेसिपी तुमच्यासाठीच आहे.
जर तुम्हाला शेंगोळ्या आणि शेवयाची भाजी आवडत असेल तर, बेसनाच्या पिठाने बनलेली ही डुबुक वडीही नक्कीच आवडेल. लगेचच जाणून घेऊया झटपट रेसिपी.
हिंग, कढीपत्ता, कांदा, कोथिंबीर, लसून, आलं, किसलेलं सुकं खोबरं, लाल तिकट, हळद, गरम मसाला, धणे-जीरे पूड, काळा मसाला, मीठ, बेसन, मिरची-कोथिंबीर पेस्ट, ओवा.
एका कढईत कांदा, लसून, आलं, सुकं खोबरं कोथिंबीरीसह भाजून घ्या. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या मदतीने वाटण तयार करा.
एका टोपात थोड्या तेलात हिंग आणि कढिपत्त्याची फोडणी तयार तरा. त्यात वाटण घालून चांगले परतून घ्या.
वाटणामध्ये चवीनुसार सगळे मसाले व मीठ घाला. त्यात गरजेनुसार पाणी घालून आमटी तयार करा.
एका वाटीत बेसन घ्या. त्यात ओवा, मिरची-कोथिंबीरची हिरवी पेस्ट आणि चवीनुसार मीठ-मसाले घाला. त्यात पाणी घालून घट्टसर मिश्रण तयार करा.
आमटी उकळत असताना बेसनाच्या मिश्रणाचे लहान लहान गोळे आमटीमध्ये सोडा. ३-४ मिनिटे आमटी उकळू द्या.
तयार झालेल्या डुबुक वडीवर कोथिंबीर घालून सजवा. गरमागरम डुबुक वडी मऊ, लुसलुशीत भाकरी किंवा पोळीसह सर्व्ह करा.