शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; शेतमालाचे होतेय नुकसान

शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; शेतमालाचे होतेय नुकसान
Farmer
FarmerSaam tv
Published On

सावदा (जळगाव) : चिनावल रोझोदा परिसरातील शेती शिवारातील पोक चोऱ्या आणि शेती साहित्य नुकसानीचे सत्र थांबत नसल्याने शेतकरी आक्रमक झाली. यामुळे त्यांनी आज सावदा (Savda) येथे सकाळी बसस्थानकासमोर बनाना शिटी शिल्पाजवळ रस्ता रोको आंदोलन करत महामार्ग रोखला. (jalgaon news Highway blocked by farmers in savda Damage to agricultural products)

Farmer
Ukraine: नुसते स्‍फोटांचे आवाज, प्रत्‍येकजण जीव मुठीत धरून; युक्रेनमधून लातुरात परतलेल्‍या ऋतुजाची प्रतिक्रीया

शेतकऱ्यांनी (Farmer) केलेल्‍या रास्‍ता रोको आदोलनात खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse), आमदार शिरीष चौधरी यांनीही भेट देऊन उपोषणात सहभागी झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक आल्याशिवाय आणि चोरांवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला.

शेतमालाचे नुकसान

काही दिवसांपासून चिनावलसह परिसरात शेतमाल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तर चिनावलला एका शेतकर्याचे 1000 केळी घड कापून फेकून दिल्याची घटना घडली. पुन्हा 500 घड कापून फेकून दिल्याची घटना घडली. यामुळे दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी व शेतकरयांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

पोलिसांकडून आश्‍वासन

अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी (Police) आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांचे ऐकून घेतले आणि कारवाईचे आश्वासन दिले. तर अध्यात्मिक संत महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, शास्त्री भक्ती किशोरदास यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांच्या बाजूने आपली भूमिका स्पष्ट करून प्रशासनाने दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पत्राद्वारे सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन थांबवण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com