Ukraine: नुसते स्‍फोटांचे आवाज, प्रत्‍येकजण जीव मुठीत धरून; युक्रेनमधून लातुरात परतलेल्‍या ऋतुजाची प्रतिक्रीया

नुसते स्‍फोटांचे आवाज, प्रत्‍येकजण जीव मुठीत धरून; युक्रेनमधून लातुरात परतलेल्‍या ऋतुजाची प्रतिक्रीया
Latur News
Latur NewsSaam tv
Published On

लातुर : युक्रेन देशातून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन पहिले विमान मुंबई इथे दाखल झाले. यात आज ऋतुजा देशमाने ही लातुर जिल्ह्यातील औसा इथे घरी आली. तिथली परिस्थिती कशी होती भारतीय दूतावसातील अधिकाऱ्यांनी मदत कशी केली याच्या आठवणीने अक्षरशः अंगावर शहारे येत असल्‍याची प्रतिक्रीया ऋतुजाने दिली. (latur news Rituja Deshmane the first student from Ukraine arrives in Latur)

Latur News
Jalgaon: अल्पवयीन मुलीचे लावले लग्न; आता तीन महिन्यांची गर्भवती

चरनिव्हस्ती या शहरात लातुर (Latur) जिल्ह्यातील औसा येथील ऋतुजा सोमनाथ देशमाने ही मुलगी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेली होती. युद्धाच्या काही दिवसांपूर्वी अशा उग्र आणि व्यापक रूप युद्धाचे होईल; असे वाटत नव्हते. पण दुर्दैवाने (Ukraine Russia War) युद्धाची व्यापकता वाढत गेली. दरम्यान एटीएम बंद पडत होते. तर खाद्यपदार्थ खरेदीसाठी मॉलमध्ये मोठी झुंबड उडाली होती. लातुरसह भारतातील अनेक विद्यार्थी (Student) किव्ह आणि खार्किव्ह या शहरात अडकून पडले.

जीवमुठीत धरून बसलेले

दिवसारात्रीला सतत बॉम्बस्फोट व्हायचे जीवमुठीत धरून माझे अनेक मित्र बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागल्यावर ऋतुजा सांगते. भारतासह अनेक देशातील विद्यार्थी शिक्षणासाठी आलेले होते. भारतीय दूतावासातील अधिकारी यांनी मदत करत रोमानिया बॉर्डरवर आणले; तिथे व्हिसा आणि अन्य तपासण्या करून विमानतळावर आणण्यात आले. तेथून मुंबईकडे (Mumbai) रवाना झालो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com