Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price: घरात साठवून ठवलेला कापूस काढला विक्रीला; भाव नसल्याने शेतकरी हतबल

Dhule News : गेल्यावर्षी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कापूस चांगला पिकला होता. सुरवातीच्या काळात भाव देखील चांगला मिळाला होता

भूषण अहिरे

धुळे : कापसाला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला होता. मात्र वर्ष उलटले तरी (Dhule) भाववाढीचे कुठलेच चिन्ह दिसत नाही. यात आता नवीन कापूस निघण्यास सुरवात झाली. यामुळे कापूस (Cotton Price) ठेवायचा कुठे या प्रश्नातून शेतकऱ्यांनी अखेर साठवलेला कापूस विक्रीला काढला आहे. (Maharashtra News)

धुळे जिल्ह्यात कपाशीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. गेल्यावर्षी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कापूस चांगला पिकला होता. सुरवातीच्या काळात भाव देखील चांगला मिळाला होता. नंतर मात्र कापसाचे भाव गडगडले. भाव वाढतील या अपेक्षेने अनेक (Farmer) शेतकऱ्यांनी आपल्या घरातच कापूस साठवून ठेवला होता. मात्र दुसऱ्या हंगामतील कापूस घरात आला तरी भाव वाढीचे कुठलेच संकेत नाही. यात आता दिवाळी आल्याने पैशांची गरज असल्याने घरात साठवून ठेवलेला कापूस (Cotton) विक्री काढण्याशिवाय गत्यंतर नाही. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रब्बीसाठीही लागणार पैसा 

यावर्षी अल्पपावसामुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास देखील हिरावून गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. यात आता शेतकऱ्यांच्या हातात रब्बी हंगामासाठीही पैसा लागणार असल्याने नाईलाजाने शेतकऱ्यांनी आता घरात साठवलेला कापूस विक्रीला काढलला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

Shoking News : घातपात की आयुष्य संपवलं? बंद घरात सापडले ४ मृतदेह, मृत्यूचं कारण गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT