Dhule News Saam tv
ऍग्रो वन

Dhule News : शेळमध्ये ठेवलेली ३२ क्विंटल कपाशी चोरी; दिवाळीच्याच रात्री चोरट्यांचा डल्ला

Dhule News : सध्या कपाशीला अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांनी कपाशी संग्रही ठेवली आहे

साम टिव्ही ब्युरो

धुळे : अगोदरच कपाशीला चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी संकटात आहे. यात शेतकऱ्याने वेचणी केलेल्या कपाशीची (Cotton) चोरी झाल्याचे प्रकार घडत आहेत. असाच प्रकार धुळे (Dhule) जिल्ह्यातील चिंचखेडा गावात घडला आहे. यात तब्बल ३२ क्विंटल कपाशी चोरीला गेल्याचे समोर आले आहे. (Live Marathi news)

म्हसदी- चिंचखेडे रस्त्यावर चिंचखेडे येथील शेतकरी केदार रामचंद्र पाटील यांची बागायती शेती आहे. पाटील यांचे शेतातच घरही आहे. शेतातील घरालगतच शेतातील माल व शेतीची अवजारे ठेवण्यासाठी शेड (Theft) उभारली आहे. या पत्र्याच्या शेडमध्ये सुमारे ३२ क्विंटल कपाशी पोत्यामध्ये भरून ठेवली होती. सध्या कपाशीला अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांनी कपाशी संग्रही ठेवली आहे. परंतु शेळमध्ये ठेवलेला हा कापूस आता सुरक्षित नसल्याचे जाणवू लागले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच साधली संधी 

लक्ष्मीपूजन अर्थात दिवाळीच्या मध्यरात्रीस चोरट्यांनी पोत्यात भरून ठेवलेली कपाशी लंपास केली. सकाळी श्री. पाटील शेतात गेल्यावर हा प्रकार लक्षात आला. श्री. पाटील कुटुंबीयांनी साक्री पोलिसांना घटनेची माहिती दिली. सध्या भुरट्या चोऱ्यांच्या घटना वाढल्या असून, पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

Oxidized Jewellery : नवरात्रीसाठी प्रत्येक मुलीकडे असावीत ‘हे’ ७ प्रकारचे ट्रेंडी ऑक्सिडाइज्ड दागिने

ठाण्यातील पूर्णेकर हत्या प्रकरणाचा पुरावा रायगडात सापडला, सत्य येणार बाहेर; SITच्या हाती काय लागलं?

SCROLL FOR NEXT