Cotton Price
Cotton PriceSaam tv

Cotton Price: सेलूत कापसाला ७२५० पर्यंत भाव; खरेदीला झाली सुरवात

Parbhani News : सेलू तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर खरीप हंगामात कापसाची लागवड करण्यात आली असून जेमतेम पाऊस झाला
Published on

परभणी : यंदा अत्यल्प पावसामुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन पिकाचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. (Parbhani) यामुळे कापसाला चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना लागून आहे. परंतु सेलूमध्ये कापसाची (Cotton Price) खरेदी सुरु झाली असून कापसाला प्रति क्विंटल ७१०० ते ७२५० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. (Tajya Batmya)

Cotton Price
Dhangar Reservation : धनगर आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटणार; सरकारने दिलेली मुदत संपली, उद्यापासून पुन्हा आंदोलन सुरू

गतवर्षी कापसाला दहा हजाराच्या वर भाव मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवला होता. परंतु अपेक्षित भाव मिळाला नव्हता. यंदा तर पाऊस कमी झाल्यामुळे कापसाचे उत्पादन देखील घटले आहे. सेलू तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर खरीप हंगामात कापसाची लागवड (Farmer) करण्यात आली असून  जेमतेम पाऊस झाला. यंदा पावसाने सरासरी देखील गाठलेली नाही. त्यामुळे कापसाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून एकाच वेचणीचे कापसाचे उत्पादन होते; अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cotton Price
Jalgaon Crime News: डोक्यात वार करून रखवालदाराची हत्या; ट्रॅक्टर घेऊन झाला फरार

कापसाला भाव चांगला मिळेल, अशी आशा आहे. यात सेलूतील खासगी कापूस जिनिंगवर कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. कापसाला ७ हजार १०० ते ७ हजार २५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. याठिकाणी कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com