Tur Price Saam tv
ऍग्रो वन

Tur Price : शेतकरी संकटात; तुरीच्या दरात तीन हजारांची घसरण, हरभऱ्यांचे दर ४०० रुपयांनी खाली

Dharashiv News : शेतकऱ्यांची तूर बाजारात येताच दरात तब्बल तीन हजार रुपयांची घसरण झाली आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. नोव्हेंबर महिन्यात तुरीला तब्बल दहा हजार रुपयांपर्यंत बाजार भाव मिळत होता

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे/ संजय राठोड 
धाराशिव/ यवतमाळ
: रब्बी हंगामातील हरभरा व तूर काढणी झाल्यानंतर मार्केटमध्ये विक्रीसाठी आणली जात आहे. मात्र शेतकऱ्याच्या घरात माल आल्यानंतर दरात घसरण होत असल्याचे पुन्हा एकदा पाहण्यास मिळत आहे. सध्या तुरीची आवक वाढली असून दरात तब्बल तीन हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर हरभऱ्याचे दर देखील चारशे रुपयांनी खाली आले आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. 

शेतकऱ्यांची तूर बाजारात येताच दरात तब्बल तीन हजार रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. नोव्हेंबर महिन्यात तुरीला तब्बल दहा हजार रुपयांपर्यंत बाजार भाव मिळत होता. परंतु बाजारात तुरीची आवक वाढताच शेतकऱ्यांना सहा ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल दराने तूर विक्री करावी लागत आहे. पावसाच्या तावडीतून शेतकऱ्यांनी हे पीक कसबसं वाचवलं होतं. मात्र दर घसरल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

हरभऱ्याची आवक वाढतात दर घसरले
यवतमाळ जिल्ह्यातील बाजारात रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक सध्या वाढली आहे. यामुळे दर हमीभावापेक्षा कमी मिळत आहेत. हरभऱ्याचा यावर्षीचा हमीभाव पाच हजार ६५० रुपये प्रतिक्विंटल असला तरी जिल्ह्यातील अनेक खाजगी बाजारपेठेत सरासरी पाच हजार २५० रूपये असा भाव मिळत आहेत. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. शासकीय खरेदीची आशा नसून पडत्या दरात शेतकऱ्यांना हरभऱ्याची विक्री करावी लागत आहे.

तिवसा येथे शासकीय तूर खरेदीचा शुभारंभ
अमरावती
: अमरावती जिल्ह्यातील तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेड मार्फत शासकीय तुर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत तूर खरेदीला सुरुवात करण्यात आली. अमरावती जिल्ह्यात नाफेडची २० केंद्रावर तूर खरेदी केंद्र आहे. अमरावती जिल्ह्यात शासनाचे वतीने ३९ हजार ६९४ टन तूर खरेदी होणार असून नाफेडचे तुरीचे शासकीय भाव ७ हजार ५५० रुपये आहे. तुर खरेदीला सुरवात झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : दिवाळी-दसऱ्यात दिवाळं निघणार, सोनं ५० हजारांनी महागणार; तज्ज्ञांच्या अंदाजाने सराफा बाजारात खळबळ

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम

Manoj Jarange Exclusive : मला मारण्याचं षडयंत्र रचलंय; मनोज जरांगेंचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

Dhananjay Munde : मोठी बातमी! धनंजय मुंडेंची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?

Saree Draping : डाव्या की उजव्या? साडीचा पदर कोणत्या बाजूला काढावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT