Haunted Fort : भारतातील सर्वात रहस्यमयी किल्ला! सूर्यास्तानंतर येथे जाण्यास मनाई, नाव ऐकताच थरकाप उडेल

Haunted Fort In India : राजस्थानमधील किल्ला हा भारतातील सर्वाधिक रहस्यमय किल्ल्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी किल्ल्यात प्रवेश करण्यास मनाई आहे.
Haunted Fort In India
Haunted FortAI PHOTO
Published On: 
Summary

भारतातील रहस्यमय किल्ला पाहून थरकाप उडेल

सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी किल्ल्यात प्रवेश करण्यास मनाई

प्राचीन मंदिरे, राजवाडे आणि भग्न वास्तू हे किल्ल्याचे खास आकर्षण

भारतामध्ये अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत. काही किल्ले त्यांच्या भव्य वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहेत, तर काही किल्ले त्यांच्या रहस्यमय इतिहासामुळे चर्चेत असतात. राजस्थानमधील भानगड किल्ला (Bhangarh Fort) हा असाच एक रहस्यमय किल्ला आहे. या किल्ल्याला भारतातील सर्वाधिक रहस्यमय आणि कथित झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक मानले जाते.चला तर मग, भानगड किल्ल्याचा इतिहास, त्यामागील रहस्ये, भुतांच्या कथा आणि या किल्ल्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात.

भानगड किल्ला लोकेशन

भानगड किल्ला हा राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील अरवली पर्वतरांगांच्या परिसरात वसलेला ऐतिहासिक किल्ला आहे. हिरव्यागार डोंगररांगा, जुन्या वास्तू आणि भग्नावस्थेतील महाल यामुळे या किल्ल्याला एक वेगळेच रूप प्राप्त झाले आहे.किल्ल्याच्या परिसरात जुनी मंदिरे, प्रवेशद्वारे, राजवाड्याचे अवशेष आणि प्राचीन बाजारपेठेचे अवशेष पाहायला मिळतात.

भानगड किल्ल्याचा इतिहास

भानगड किल्ल्याची निर्मिती १६व्या शतकात झाल्याचे मानले जाते. आमेरचे राजा भगवान दास यांनी हा किल्ला बांधल्याचे ऐतिहासिक संदर्भ सांगतात. पुढे त्यांचा मुलगा राजा माधोसिंह याने भानगडचा विकास केला.त्या काळात भानगड हे एक समृद्ध नगर होते. येथे राजवाडे, मंदिरे, बाजारपेठा आणि निवासी वसाहती होत्या. किल्ल्याच्या परिसरात आजही त्या काळातील वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. काळाच्या ओघात हे शहर उजाड झाले आणि किल्ला भग्नावस्थेत गेला.

भानगड किल्ल्यात सूर्यास्तानंतर प्रवेश बंद

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या (ASI) नियंत्रणाखाली असलेल्या या ऐतिहासिक परिसरात सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर प्रवेश करण्यास मनाई आहे. काही लोकांचा दावा आहे की रात्री येथे विचित्र आवाज ऐकू येतात, तर काहीजण या परिसरात आत्म्यांचा वावर असल्याच्या गोष्टी सांगतात. मात्र अशा दाव्यांना वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.

भानगड किल्ल्याची वास्तुकला

भानगड किल्ला केवळ रहस्यमय कथांसाठीच नाही, तर त्याच्या ऐतिहासिक वास्तुकलेसाठीही प्रसिद्ध आहे. अरवली पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या या किल्ल्याला तीन स्तरांची तटबंदी आणि पाच मोठी प्रवेशद्वारे होती. किल्ल्याच्या परिसरात राजपूत स्थापत्यशैलीची सुंदर उदाहरणे पाहायला मिळतात. येथे चार मंदिरे आहेत. (गोपीनाथ मंदिर, सोमेश्वर मंदिर,मंगला देवी मंदिर, केशव राय मंदिर)

Haunted Fort In India
Konkan Forts : कोकणातील जलदुर्गांचा थाटच न्यारा! हिवाळ्यात आवर्जून फिरा मराठ्यांच्या शौर्याची साक्ष देणारे ६ भव्य किल्ले

भानगड किल्ल्याला कसे पोहोचाल?

दौसा किंवा अलवर रेल्वे स्थानकावर उतरून पुढे टॅक्सी किंवा स्थानिक वाहनाने किल्ल्याजवळ जाता येते. भानगड किल्ल्याला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी चांगला मानला जातो. या काळात राजस्थानमधील वातावरण तुलनेने थंड आणि आल्हाददायक असते.

भानगड किल्ल्याबद्दल काही रंजक गोष्टी

  • भानगड किल्ला भारतातील सर्वाधिक चर्चिल्या जाणाऱ्या रहस्यमय ठिकाणांपैकी एक आहे.

  • या किल्ल्याचा संबंध राजा माधोसिंह आणि राजकुमारी रत्नावती यांच्या कथांशी जोडला जातो.

  • येथे अनेक प्राचीन मंदिरे आणि राजवाड्यांचे अवशेष आहेत.

  • किल्ल्याच्या परिसरात सूर्यास्तानंतर प्रवेश करण्यास मनाई आहे.

  • हा किल्ला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या संरक्षणाखाली आहे.

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.