Soyabean Price Saam tv
ऍग्रो वन

Soyabean Price : प्रतिक्षा करूनही सोयाबीनचे दर वाढेना; शेतकरी विवंचनेत

Dharashiv News : जिल्ह्यातील कळंब, भुम, धाराशिव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पिक घेतले

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : सोयाबीनचे उत्पादन घेतल्यानंतर त्याला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्याला होती. यामुळे काढणी केल्यानंतर (Soyabean) सोयाबीन विक्री न करता त्याची साठवणूक केली. मात्र प्रतीक्षा करून देखील सोयाबीनच्या दरात वाढ होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. (Latest Marathi News)

धाराशिव (Dharashiv News) जिल्ह्यात खरीप हंगामात मुख्य पीक म्हणून सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. यंदा जिल्ह्यातील कळंब, भुम, धाराशिव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पिक घेतले. लागवड खर्चाच्या तुलनेत सोयाबीनला किमान ५५०० ते ६ हजार इतका भाव मिळणे (Soyabean Price) अपेक्षित होते. मात्र यंदा सोयाबीनला केवळ ४ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ज्या शेतकऱ्यांना अडचणी आहेत त्यांनी सोयाबीन विक्री सुरू केली आहे. तर बहुतांश शेतकरी भाव वाढतील या आशेवर आहेत. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील सोयाबीनला अपेक्षित दर मिळणे अवघड झाले आहे. प्रतिक्षा करुन देखील भाव वाढत नसल्याने सोयाबीन घरी ठेवावे की विकुन मोकळे व्हावे; अशा विवंचनेत शेतकरी सापडला आहे. मात्र त्यामुळे सोयाबीन भावाबाबत सरकारने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यातुन केली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: नूडल्स खाणाऱ्यांनो सावधान! पाकिटामध्ये आढळली मेलेली पाल; VIDEO व्हायरल

Pune Kharadi Rave Party: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांकडून मोठी चूक; कोर्टात उघडकीस आला प्रकार

Ladki Bahin Yojana : लाडकीचे किती अर्ज आले? किती अपात्र? दर महिन्याला किती पैसे लागतात?

Maharashtra Politics: रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदमांनी घेतली अनिल परबांची भेट, राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

Mehndi Design: श्रावणात हातावर उठून दिसतील सोप्या अन् आकर्षक मेंहदी डिझाईन्स

SCROLL FOR NEXT