farmers Saam Digital
ऍग्रो वन

Kailas Patil News : 'तुमचा सत्तेचा खेळ झाला असेल तर शेतकऱ्यांकडं लक्ष द्या'

Dharashiv News : धाराशिव शहरातील सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राची पाहणी केली असता यावेळी सोयाबीन खरेदीच्या गोंधळावरुन कैलास पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नाही. एकीकडे राज्यात सत्ताधाऱ्यांना बहुमत मिळाले असुन ते सध्या मुख्यमंत्री, मंत्री होण्यासाठी धावपळ करत आहेत. तुमचा हा सत्तेचा खेळ झाला असेल, तर शेतकऱ्यांकडे ही बघा; अशा शब्दात कैलास पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

धाराशिव (Dharashiv News) शहरातील सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राची पाहणी केली असता यावेळी सोयाबीन खरेदीच्या गोंधळावरुन कैलास पाटील (Kailas Patil) यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. शासनाने सोयाबीनसाठी हमीभाव निश्चित केला आहे. मात्र त्यानुसार खरेदी केंद्रावर सोयाबीनची खरेदी केली जात नाही. यामुळे शेतकरी देखील या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवत आहेत.  

अर्धा टक्का देखील खरेदी नाही 

धाराशिव जिल्ह्यात ज्या पध्दतीने सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राची संख्या वाढवणे गरजेचे होते. त्याप्रमाणे ती वाढलेली नाही. ही संख्या केवळ १८ असुन आतापर्यंत २५ हजार क्विंटल खरेदी झाली आहे. मात्र जिल्ह्यातील उत्पन्न पाहता ही खरेदी अजुन अर्धा टक्का देखील झाली नसल्याचे पाटील म्हणाले. 

शेतकऱ्यांना दर मिळत नाही 

तसेच केंद्राच्या परिपत्रकानुसार १२ टक्के ओलाव्याची अट होती. त्यात १२ ऐवजी १५ टक्के ओलावा असला तरी सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र हा निर्णय देखील चुनावी जुमलाच ठरला आहे. एकीकडे सोयाबीनची खरेदी ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असला तरी नियम व निकषामुळे शेतकऱ्यांना दर मिळत नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT