Dombivali News : डोंबिवलीची वाहतूक कोंडी फुटणार; मोठा गाव रेल्वे क्रॉसिंगवर होणार चार पदरी उड्डाणपूल

Dombivali News : डोंबिवली पश्चिम भागातील दिवा- वसई रेल्वे मार्गावरील डोंबिवली मोठा गाव येथे असलेल्या रेल्वे फाटकामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.
Dombivali News
Dombivali NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: डोंबिवली मोठा गाव येथील रेल्वे क्रॉसिंग या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीवर उपाय काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून डीएफसीसीएलच्या अंतर्गत दोन लेनच्या ब्रिजचे काम प्रस्तावित करण्यात आले होते. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी दोन लेन ऐवजी चार लेनचा उड्डाणपूल उभारण्यात यावा; या मागणीला यश आले असून, रेल्वे प्रशासनाने आता चार लेन ब्रिजसाठी मंजुरी दिली आहे. यामुळे वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

डोंबिवली (Dombivali News) पश्चिम भागातील दिवा- वसई रेल्वे मार्गावरील डोंबिवली मोठा गाव येथे असलेल्या रेल्वे फाटकामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. येथून जाणाऱ्या- येणाऱ्या चाकरमान्याना नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असते. हि समस्या नेहमीचीच असून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे (Railway) फाटकाजवळ चार लेनचा रेल्वे उड्डाण पूल तयार केला जाणार आहे; अशी माहिती उद्धव सेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी दिली.  

१६८ कोटींचा निधी मंजूर 

रेल्वे फाटकऐवजी याठिकाणी प्रस्तावित असलेला उड्डाणपूल दोन लेन वाढवून हा रेल्वे उड्डाणपूल चाल लेनचा करण्याची मागणी माजी नगरसेवक म्हात्रे यांनी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे २०१९ पासून पाठपुरावा सुरु होता. आता चार लेनचा रेल्वे उड्डाण पूल तयार करण्याची मागणी रेल्वे प्रशासानाकडून मान्य करण्यात आली आहे. या रेल्वे उड्डाण पूलाच्या कामासाठी १६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या खर्चातून पूलाच्या कामासाठी आवश्यक असलेले भूसंपादनाचे काम केले जाणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या अखत्यारीत असलेली कामे देखील केली जाणार आहे.

Dombivali News
Rohit Pawar News : राम शिंदे यांचं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाच आव्हान; फेर तपासणीवरून रोहित पवारांची टीका

माणकोली खाडी पुलाला जोडला जाणार पूल 

रेल्वे उड्डाणपूल मोठा गाव माणकोली या खाडी पुलाला जोडला जाणार आहे. त्याचबरोबर डोंबिवली पश्चिमेत रेल्वे स्टेशनच्या दिशेनेकडील प्रभाग कार्यालयाच्या आधी तसेच आनंदनगर याठिकाणी त्याला पोहच रस्ता दिला जाणार आहे. या रेल्वे उड्डाण पूलाच्या कामाची निविदा लवकर काढली जाणार असून  निविदा काढून कंत्राटदार निश्चीत झाल्यावर हे काम वर्षभरात मार्गी लागणार आहे. 

Dombivali News
Jalgaon News : कर्जफेडीच्या विवंचनेत शेतकऱ्याने संपविले जीवन

त्यानंतर रेल्वे फाटक होणार बंद 

सदरच्या कामासाठी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनीही विशेष पाठपुरावा केल्याने हे काम मार्गी लागत असल्याची कबूली माजी नगरसेवक म्हात्रे यांनी दिली आहे. रेल्वे उड्डाणपूलाचे काम पूर्ण होताच, डोंबिवली माेठागाव येथील रेल्वे फाटक बंद होणार असून डोंबिवलीतून थेट मोठा गाव ठाकूर्ली माणकोली पूल गाठता येणार आहे. त्यामुळे डोंबिवलीकराना दिलासा मिळणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com