Dharashiv News Saam tv
ऍग्रो वन

Dharashiv News : केवायसी करूनही दुष्काळी अनुदानापासून वंचित; धाराशिव जिल्ह्यातील ४१ हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Dharashiv News : केवायसी केलेली असतानाही त्यांना दुष्काळी अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात एकीकडे तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यांना खरीपाची पेरणी करण्यासाठी पैसा नाही, तर दुसरीकडे दुष्काळ असलेल्या धाराशिव, लोहारा व वाशी तालुक्यातील ४१ हजार ६९८ शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळण्याची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे. 

धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. यासाठी शासनाने दुष्काळी अनुदान देण्याचे जाहीर केले होते. याकरिता केवायसी करणे अनिवार्य होते. दरम्यान केवायसी केलेली असतानाही त्यांना दुष्काळी अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. ३१ ऑक्टोबरला शासनाने ४० तालुक्यांमध्ये गंभीर, मध्यम स्वरूपाचा (Drought) दुष्काळ जाहीर करून विविध प्रकारच्या सवलती जाहीर केल्या होत्या. 

धाराशिव जिल्ह्यातील लोहारा, वाशी व धाराशिव या तीन तालुक्याचा समावेश आहे. यामध्ये १ लाख ५४ हजार २५९ शेतकऱ्यांना (Farmer) २०८ कोटी ५० लाख अनुदान मंजुर झाले होते. यातील ४१ हजार शेतकरी निधी नसल्याने केवायसी करुन ही दुष्काळी अनुदानापासुन वंचित आहेत. त्यामुळे हे अनुदान तातडीने द्यावे; अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT