Dharashiv Rain Saam tv
ऍग्रो वन

Dharashiv Rain : २ लाख हेक्टरवरील काढणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान; धाराशिव जिल्ह्यात पावसामुळे १२०० कोटींचे नुकसान

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात मागील दोन- तीन दिवसांपासून सातत्याने मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन काढणीवर आला होता. अशात सुरु असलेल्या पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील सुमारे २ लाख हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचे नुकसान झाले आहे. 

मागील दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. यामुळे शेतात काढणीवर आलेले (Soyabean Crop) सोयाबीन. मका पीक काढून घेण्यावर शेतकऱ्यांचा भर होता. त्यानुसार बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन काढुन शेतातच ठेवले आहे. तर काहींनी कापून ठेवला आहे. मात्र पावसामुळे मोठे नुकसान झाल आहे. दरम्यान १६ मंडळात अतिवृष्टी झाली असल्याने ३ लाख ६१ हजार शेतकऱ्यांनी पिक विम्यासाठी सुचना दिल्या आहेत. (Dharashiv News) यामध्ये सर्वांच्या शेतात पंचनामा होणार नसुन नमुना सर्वेक्षण होणार आहे; अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी दिली.

१२०० कोटींचा फटका 

अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने सोयाबीन पिकाचा अक्षरशः चिखल झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान प्राथमिक अंदाजानुसार दोन लाख हेक्टरवरील सोयाबीन खराब होण्याची शक्यता वर्तविली जात असून शेतकऱ्यांना अंदाजे १२०० कोटीचा फटका बसणार आहे. तर असाच पाउस सुरू राहीला तर नुकसानीत वाढ होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मराठवाडा-विदर्भासाठी भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; शाह - पवारांमध्ये राजकीय कुस्ती

Mumbai Schools Closed Tomorrow : मुंबईत वरुणराजा धो धो बरसला, शहरांतील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Marathi News Live Updates: नवी मुंबई परतीच्या पावसाचा धुमाकूळ,

Mumbai Rain: मुंबईत 'रेड अलर्ट', पावसामुळे नागरिकांची दाणादाण; लोकल सेवा विस्कळीत, ट्रेनची सद्यस्थिती काय? जाणून घ्या

Laxman Hake : जरांगे पाटील नावाचं लूत भरलेलं घोडं आम्ही वेशीत अडवलं; लक्ष्मण हाके यांची टीका

SCROLL FOR NEXT