Milk Subsidy Saam tv
ऍग्रो वन

Milk Subsidy : दुधाच्या अनुदानापासून शेतकरी वंचित; रस्त्यावर दूध ओतून केला शासनाचा निषेध

Dharashiv News : दुधाला चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी अगोदरच नाराज आहेत. राज्यात काही ठिकाणी दुधाचे दर वाढविण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केली आहेत

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : दुधाला कमी दर मिळत असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र अनेक शेतकऱ्यांना अद्याप हे अनुदान मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज धाराशिवमध्ये रस्त्यावर उतरत आंदोलन केले. रस्त्यावर दूध ओतून राज्य सरकारचा निषेध केला.  

दुधाला (Milk) चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी अगोदरच नाराज आहेत. राज्यात काही ठिकाणी दुधाचे दर वाढविण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केली आहेत. आता देखील हे आंदोलन सुरु आहेत. मात्र सरकारकडून दूध दर वाढीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. तर यापूर्वी शेतकऱ्यांनी (Farmer) आंदोलन केल्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. परंतु शेतकऱ्यांना हे अनुदान वेळेवर मिळत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळेच धाराशिवमध्ये शेतकरी आक्रमक झाले. 

रस्त्यावर ओतले दूध 
दूध डेअरी चालकाने (Milk Price) दुध उत्पादक शेतकऱ्यांची माहीती तसेच कागदपत्रे शासनाला कळवली नसल्याने अनुदान मिळाले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे धाराशिवच्या (Dharashiv) जुनोनी गावातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेकडो दुध उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतुन शासनाचा निषेध केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Politics : सोलापुरात शिंदे गटाच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; राजकीय वर्तुळात खळबळ

GK: भारताव्यतिरिक्त 'या' देशांमध्येही रुपया चालतो, प्रवास करण्याआधी जाणून घ्या

Big Boss 18: अशनीर ग्रोव्हरची बिग बॅासमध्ये एन्ट्री; सलमान खानने घेतली शाळा,VIDEO व्हायरल

Shahapur Vidhan Sabha : शहापूरमध्ये मोठी घडामोड; जयंत पाटलांच्या भेटीनंतर बबन हरणेंचा मविआला पाठींबा

Money Astrology: या राशींचे लोक होणार धनवान, रखडलेले पैसेही हातात मिळणार

SCROLL FOR NEXT