नवाब मलिक
नवाब मलिक  राजेश काटकर
ऍग्रो वन

राज्य सरकारने प्रयत्न करूनही पिक विमा योजना चांगल्या पद्धतीने चालत नाही - नवाब मलिक

राजेश काटकर

परभणी : राज्य सरकारने कितीही प्रयत्न केले तरी पिक विमा योजना ही चांगल्या पद्धतीने चालत नाही, ही सत्यपरिस्थिती असल्याचे विधान अल्पसंख्यांक मंत्री व परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी परभणीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना केले आहे.

हे देखील पहा -

मोदी जरी पिक विमा योजनेबद्दल बोलत असले तरी गुजरात सरकारने पीक विमा योजना चांगल्या पद्धतीने चालत नसल्यामुळे हि योजनाच बंद केली केली ही सत्य परिस्थिती आहे. इन्शुरन्स कंपनीचे परभणी जिल्ह्यात एकही कार्यालय नाही. या कंपन्यांचा सर्व एकमे ऑनलाइन पद्धतीने करण्याचा हेका असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हि योजना चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी राज्य शासन काही वेगळ्या पद्धतीने उपाययोजना करू शकते का असा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकार स्वतःची इन्शुरन्स कंपनी काढून शकते का यावर देखील विचार येणाऱ्या कॅबिनेट मध्ये करणार असल्याचे मालिकांनी सांगितले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astrology: हातात, पायात आणि कमरेला काळा धागा का बांधतात?

Today's Marathi News Live : नाशिक लोकसभेचे दोन दिग्गज उमेदवार प्रचार रॅली दरम्यान आमने सामने

Nailgrowth Effects: तुमची नखं झपाट्याने वाढतायेत? आरोग्यासाठी ठरेल धोक्याची घंटा!

T20I Records: विराट,धोनी नव्हे, तर या रेकॉर्डमध्ये रोहितच नंबर १

Pune Rain Update : ऐन उन्हाळ्यात पुण्याला पावसानं झोडपलं; उकाड्याने हैराण झालेल्यांना मिळाला दिलासा

SCROLL FOR NEXT