Sakshi Sunil Jadhav
उंदराचे पुढचे दात आयुष्यभर वाढत असतात. त्यामुळे तो लाकूड,प्लास्टिक, वायर किंवा कागद यांसारख्या वस्तू कुरतडून दातांची लांबी नियंत्रित ठेवतो.
मादी उंदीर वर्षभरात अनेक वेळा पिल्लांना जन्म देऊ शकते. एका वेळी ६ ते १२ पिल्ले जन्माला येऊ शकतात.
उंदराची वास घेण्याची क्षमता खूप चांगली असते. त्यामुळे ते अगदी लपवून ठेवलेले अन्नही सहज शोधू शकतात.
घरात किंवा शहरांमध्ये असणारा उंदीर १ ते ३ वर्षापर्यंत जगतो. सुरक्षित वातावरण आणि पुरेसं अन्न मिळाल्यावर काही उंदीर यापेक्षा जास्त जगतात.
उंदीर हा निशाचर प्राणी आहे. दिवसा ते लपून बसतात आणि रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतात.
उंदीर घरातलं धान्य, कपडे, महत्त्वाची कागदपत्रे, पुस्तके फर्निचर आणि इलेक्ट्रिक वायरचे मोठे नुकसान करू शकतात. त्यामुळे तुम्हाला गंभीर समस्यांनाही सामोरं जावं लागू शकतं.
उंदीर काही संसर्गजन्य रोगांचं वाहक असू शकतात. त्यांच्या विष्ठा, लघवी किंवा दूषित अन्नाच्या संपर्कातून काही आजार पसरण्याची शक्यता असते.
घरातले अन्नपदार्थ बंद डब्यांमध्ये ठेवा, कचरा वेळेवर टाका, भितींमधल्या फटी बंद करा आणि घराची नियमित स्वच्छता ठेवा.