Cotton Price
Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price: कापसाच्‍या दरवाढीची अजूनही प्रतिक्षाच; भाव नसल्याने कापूस घरात

संजय तुमराम

चंद्रपूर : कापसाचे दर वाढतील या आशेने शेतकरी बसला आहे. परंतु, अजूनपर्यंत राज्‍यात कोठेच कापसाची दरवाढ (Cotton Price) झालेली दिसून येत नाही. व्‍यापारी देखील कापूस खरेदी करत नसल्‍याचे चित्र आहे. यामुळे गेल्‍या दोन– अडीच महिन्‍यांपासून कापसाची दरवाढीची अपेक्षेत बसलेल्‍या बळीराजाचा (Farmer) कापूस अजूनही घरात पडून आहे. (Breaking Marathi News)

चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे चार लाख हेक्टर शेती योग्य क्षेत्रापैकी सव्वा लाख हेक्टरवर कापूस उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात वरोरा- भद्रावती व राजुरा उपविभागात मोठा कापूस पेरा केला जातो. मात्र दरवर्षी कापसाला भाव नसल्याने शेतकरी मोठ्या कष्टाने पिकवलेला कापूस मातीमोल दरात देण्यास नाईलाजाने तयार होतात. यंदा देखील हीच स्थिती आहे. मागील वर्षी कापसाचे दर बारा हजार रुपये प्रतिक्विंटल एवढे होते. मात्र सध्या हेच दर साडेसहा हजारांवर स्थिरावले असल्याने प्रचंड आर्थिक नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांनी आपला कापूस घरातच साठवून ठेवला आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली

घरात साठवून ठेवलेला हा कापूस (Cotton) विविध आजारांना निमंत्रण देणारा असून हा किती काळ साठवून ठेवायचा; अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. याशिवाय कापूस ज्वलनशील असल्याने त्याची अधिक काळजी घ्यावी लागते. अशा स्थितीत सरकारने यात दखल देत कापसाचे भाव मागील वर्षीएवढे बारा हजार (Chandrapur) रुपये क्विंटल करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नवीन हंगाम पुढ्यात असताना शेतकऱ्यांना आपले आर्थिक गणित जुळविण्यासह घरची लग्नकार्य, मुलांचे शिक्षण व इतर गोष्टीसाठी रक्कम हाती हवी आहे. अशातच घरात साठवून ठेवलेला कापूस पुन्हा एकदा मातीमोल दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mohan Bhagwat : समाजात जोपर्यंत विषमता आहे, तोपर्यंत आरक्षण असलं पाहिजे : मोहन भागवत

Nagpur Crime: नागपुरात स्पा सेंटरच्या नावाखाली 'नको ते धंदे'; पोलिसांकडून परराज्यातील ३ महिलांची सुटका

Salary Hike 2024 : यंदा नोकरदारांच्या पगारात होणार भरघोस वाढ! किती वाढणार तुमची सॅलरी?

Kalyan Murbad Railway Line: कल्याण मुरबाड रेल्वेच्या भूसंपादनाला शेतक-यांचा विरोध, पाेलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदाेलन शमले

Herbal Tea पिणं आरोग्यासाठी लाभदायी

SCROLL FOR NEXT