डाळवर्गीय पिकाच्या मुक्त आयातीला केंद्राची परवानगी; व्यापारी आणि शेतकऱ्यांच नुकसान Saam Tv
ऍग्रो वन

डाळवर्गीय पिकाच्या मुक्त आयातीला केंद्राची परवानगी; व्यापारी आणि शेतकऱ्यांच नुकसान

शेतकऱ्यांना आता सुलतानी संकटाला सामोरे जावे लागणार

दीपक क्षीरसागर

लातूर - नुकतेच केंद्र सरकारने डाळवर्गीय पिकाला मुक्त आयातीला परवानगी दिली आहे. यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा निर्णय झाला असून एकाच दिवसात डाळवर्गीय पिकांचे भाव 200 रुपयांनी भाव कोसळले आहेत. याचा व्यापारी आणि शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. काल केंद्र सरकारने तूर हरभरा आणि मूग या पिकाच्या डाळीला मुक्त आयातीची 31 मार्च 2022 पर्यंत परवानगी दिली आहे. याची आयातीचा माल 30 जून 2022 पर्यंत देशात पोहचू शकतो असा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या जॉईंट सेक्रेटरी दिवाकर नाथ मिश्रा यांनी नोटिफिकेशन जारी केले आहे.

हे देखील पहा -

याचा देशातील डाळ व्यापारी आणि डाळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. देशात किती डाळीचं उत्पादन झाले आहे. याचा विचार करून आयातीचा निर्णय घेणे अपेक्षित असताना तसा निर्णय घेण्यात आला नाही पाच राज्याच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हरभरा, तूर आणि मुगाच्या वाढ होऊ नये यासाठी हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे कोणाचंही भलं झाले नसल्याचे मत लातुरचे प्रसिद्ध डाळ उद्योजक रतन बिदादा यांनी व्यक्त केले आहे.

केंद्र सरकारने मागील काळात सोयाबीन पेंडीच्या आयातीचा निर्णय असो की डाळवर्गीय पिकांच्या मुक्त आयातीचा निर्णय असो या केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच मरण होत आहे. चालू वर्षी मराठवाड्यात खरीप पिकांचं अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झाले तर तूर पिकाला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट झाली आहे.

याचं डाळवर्गीय पिकाला हमीभावाच्या जवळपास भाव मिळत असे पण केंद्र शासनाच्या निर्णयामुळे तूर हरभरा आणि मुगाच्या दरात दोनशे ते चारशे रुपयांनी भाव खाली आले असून केंद्र सरकारने शेतकरी विरोधी निर्णय घेऊ नये नाही तर शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सत्तार पटेल यांनी दिला आहे.

एकंदरीत केंद्राच्या निर्णयामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी नुकसान होणार आहे अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता सुलतानी संकटाला सामोरे जावे लागणार हे नक्कीच.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अमित शहांच्या बॅगांची तपासणी

BKC Metro Fire: बीकेसी मेट्रो स्टेशनला आग; आगीमुळे सर्व मेट्रो थांबवल्या

Breakfast Dishes : तुमच्या लहानग्यांसाठी हेल्दी अन् टेस्टी नाश्ता, मुलं बोट चाटत राहतील

Pune Crime : गार वडापाव दिल्याचा राग; स्नॅक्स सेंटर मालकाला जबर मारहाण

W,W,W,W,W,W,W,W,W,W.. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाने रणजी ट्रॉफीत राडा केला! Anshulने एकाच डावात घेतल्या 10 विकेट्स

SCROLL FOR NEXT