मालेगाव शहरात खळबळ! गोळीबार करीत व्यापाऱ्याला लुटले

गोळी लागल्याने एकाचा मृत्यू तर एक जण जखमी
मालेगाव शहरात खळबळ! गोळीबार करीत व्यापाऱ्याला लुटले
मालेगाव शहरात खळबळ! गोळीबार करीत व्यापाऱ्याला लुटलेगजानन भोयर
Published On

वाशिम - मालेगाव शहरात खळबळजनक घटना उडाली आहे. वाशिमच्या मालेगाव शहरातील अंजनकर ज्वेलर्सचे मालक महेश अंजनकर आपले दुकान बंद करून घरी जात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आली आहे. यामध्ये रवी वाळेकर यांना गोळी लागल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. तर महेश अंजनकर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे.

हे देखील पहा -

चोरीच्या उद्देशाने 3 ते 4 अज्ञात चोरटे मोटारसायकलवर येऊन चाकूने वार करीत गोळीबार करून, पसार झाले.चोरट्याची मोटारसायकल घटनास्थळी मिळाल्याने या आधारे अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. याचा पुढील तपास मालेगाव पोलीस करीत आहेत. मात्र दिवसागणिक चोरीचे प्रमाण वाढल्याने व्यापाऱ्यासह नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com