Breaking : हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या जमिन संपादनाला शेतक-यांचा विरोध..! saam tv news
ऍग्रो वन

Breaking : हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या जमिन संपादनाला शेतक-यांचा विरोध..!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रोहीदास गाडगे

जुन्नर : पुणे नाशिक (Pune-Nasik ) हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (Highspeed Railway Project) जमिन संपादनाला शेतक-यांचा तीव्र विरोध केला आहे. पुणे-नाशिक आणि कल्याण-नगर महामार्गावर आळेफाट्यावर (Ale Phata) शेतकऱ्यांनी रास्तारोको केले आहे. रेल्वे प्रकल्पाला बागायती जमिनीचा एक इंचही जमिन देणार नसल्याचा शेतक-यांचा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी दिला आहे. (Breaking: Farmers oppose land acquisition for high speed railway project ..!)

खेड,आंबेगाव,शिरुर,हवेली,जुन्नर तालुक्यातील प्रकल्पबाधित शेतक-यांसह महिला शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आळेफाटा येथे पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच दंगल विरोधी पथकही दाखल आंदोलनाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.

पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या जमिन संपादनाला सुरवातीपासून शेतक-यांनी विरोध सुरु केला असताना प्रशाकिय पातळीवर जमिनीच्या मोजणीसाठी तयारी केली जात असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहे बागायती जमिनीतुन रेल्वे जात असल्याने अनेक शेतकरी भुमिहिन होत आहे त्यामुळे खेड,हवेली,आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहे रेल्वे प्रकल्पाला बागायती जमिनीचा एक इंचही तुकडा देणार नसल्याचा आक्रमक पावित्रा शेतक-यांनी घेत पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटा येथे रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले.

पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प होत असताना बागायती जमिनी वगळुन जमिनींचे संपादन करणे अपेक्षित होते. मात्र या प्रकल्पात बागायती जमिनी जास्त प्रमाणात संपादित होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक शेतकरी भुमिहिन होत आहे. विकासाला आमचा विरोध नाही, मात्र शेतक-यांना मारुन असे प्रकल्प उभारले जात असतील तर पुढील काळात शेतकरी अधिक आक्रमक होईल. या विरोधाला राज्य सरकारला शेतक-यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा पुणे रिंग व पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प कृती समितीचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी यांनी दिला.

पुणे नाशिक रेल्वेसाठी तीन ठिकाणावरुन सर्वे करण्यात आला मात्र हा सर्वे होत असताना बागायती जमिनी वघळण्यात याव्यात अशा सुचना होत्या असं असताना सध्याच्या आराखड्यात बागायती जमिनी मोठ्या प्रमाणात जात असल्याने बाधित शेतकरी आक्रमक झाला आहे.

रेल्वे प्रकल्प होत असताना दोन्ही बाजुला रेड झोन करण्यात येणार असल्याने शेतक-यांची मोठी अडचण होत आहे याबाबत शासकिय पातळीवरुन शेतक-यांशी संवाद होत नसल्याने जमिनी संपादनात स्पष्टता नाही असंही आंदोलक शेतकरी म्हणतात.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखीन एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे 'विराट' आघाडी; न्यूझीलंडची ३५६ धावांनी सरशी, रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT