शिवसेना भवनावर हल्ला करणाऱ्यांची भाषा करणाऱ्यांचे राजकारण शिल्लक राहिले नाही. अशी भाषा करणाऱ्या लोकांमुळे भाजप डुबेल. त्याची माफी मान्य नाही. अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते प्रसाद लाड यांना इशारा दिला आहे. (Sanjay Raut slams BJP over Prasad Lad's statement)
भाजपा नेते प्रसाद लाड यांनी दोन दिवसांपुर्वी झालेल्या एका जाहीर सभेत शिवसेना भवन फोडण्याचे वक्तव्य केले होते. त्यांनंतर हा वाद विकोपाला जाऊ शकतो. असे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी माफी मागितली. पण त्यानंतर संतापलेल्या शिवसैनिकांनी त्यांना त्याच भाषेत उत्तरेही दिली.
शिवसेना भवन तोडू हे बोलणे रोगट लक्षण आहे. ज्यांना मराठी अस्मितेची जाणीव आहे ते असे बोलणार नाहीत. मूळ भाजपचे कार्यकते आणि नेते असे म्हणणार नाही. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना भवन विषयी बोलणार नाही. बाहेरून आलेले बाटगे असे बोलतात. एक झापड दिली तर उठणार नाही, असे कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. आम्ही शिवसैनिकांनी जखमा अंगावर घेतल्यात. शिवसेना भवन प्रखर राष्ट्रवादाचे प्रतीक आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन पार पडले. मात्र फक्त १८ तासच संसदेचे कामकाज झाले. त्याला आम्ही विरोधी पक्ष जबाबदार नाही. सरकारने गदारोळात ही विधेयके पारित केल्याचे यावेळी संजय राऊत यांनी सांगितले. त्याचबरोबर, छत्रपती शिवाजी महाराज या नावानेच एअरपोर्ट ओळखले जाईल. उद्योगपतींचे नाव शिवसेना खपून घेणार नाही, असाही इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला आहे.
Edited By- Anuradha
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.