Bhandara Rain Saam tv
ऍग्रो वन

Bhandara Rain : भंडाऱ्यात पावसाने झोडपले; धानाला कोंब फुटण्याची भीती

Bhandara News : निलज येथील गुरुदेव भोंडे या शेतकऱ्यांनी रडता रडता आपली ही व्यथा सांगितली आहे. शासन ऐकत नाही, तलाठी येत नाही; काय करावं हातातोंडाशी आलेला घास हिरावला घेतला आहे

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : राज्यात परतीच्या पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. मागील आठवडाभरापासून परतीचा पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा या पावसात नुकसान होत आहे. दरम्यान भंडाऱ्यात देखील पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे कडपा भिजला असून लोंबीतील धानाला कोंब फुटण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आले आहे. 

निसर्गाने धान उत्पादकांना पुन्हा एकदा संकटात आणले आहे. भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादकांना पावसाने झोडपल्याने हजारो एकरातील धान पिक पाण्यात सापडले आहे. धानाच्या कडपा पावसात भिजल्याने आता धानाला कोंब फुटण्याचा धोका वाढला आहे. हे वातावरण पुढचे चार दिवस असेच राहिले तर हलका आणि मध्यम धान हातातून जाण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. 

शेतकऱ्याच्या डोळ्यात तरळले पाणी 

भंडारा जिल्ह्यातील निलज बुजुर्ग या गावातील हजारो हेक्टर शेतात कापून ठेवलेला भातपीक कडपा आणि मळणी केलेला धानाचा पुंजना भिजला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. निलज येथील गुरुदेव भोंडे या शेतकऱ्यांनी रडता रडता आपली ही व्यथा सांगितली आहे. शासन ऐकत नाही, तलाठी येत नाही; काय करावं हातातोंडाशी आलेला घास हिरावला घेतला आहे.

नाशिक जिल्ह्यात कालपासून पाऊस 

नाशिक जिल्ह्यात देखील काल पासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतात पाणी साचले आहे. या पावसामुळे नवीन लागवड केलेला कांदा पाण्याखाली गेला आहे. तर मक्याच्या शेतात पाणीच पाणी साचले असल्याने मका खराब होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. सततच्या पावसाने आधीच नुकसान झाले असून आता परतीच्या पावसाने देखील मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एका दिवसात किती पुश-अप्स मारले पाहिजेत?

Maharashtra Live News Update: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का; पाटील यांचे तीन शिलेदार कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गोटात जाणार

सततच्या दातदुखीमागे लपलेले असू शकतात 'हे' आजार

Maharashtra Politics: शरद पवारांना बालेकिल्लात मोठा हादरा, ३ शिलेदारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

त्वचेवर दिसून येतात युरीक एसिडचे धोकादायक संकेत, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT