Bhandara News Saam tv
ऍग्रो वन

Bhandara News : धान खरेदी केंद्रावरील नोंदीपासून शेतकरी वंचित; पिकाची नोंद सातबारावर नसल्याने अडचण

Bhandara News : भंडारा जिल्हा हा भात पिकाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते. मात्र शेतात असलेल्या पिकाची नोंद सातबारावर असणे आवश्यक आहे

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: शेतकऱ्यांसाठी शासनाने ई- पीक हे अँप सुरु करून या अँपमधून शेतकऱ्यांना पिकांची नोंद करावयाची असते. मात्र भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पिकाची नोंद सातबारावर केली नसल्याने आता हे शेतकरी धान खरेदी केंद्रावरच्या नोंदींपासून वंचित राहत आहेत.  

भंडारा (Bhandara News) जिल्हा हा भात पिकाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते. मात्र शेतात असलेल्या पिकाची नोंद सातबारावर असणे आवश्यक आहे. त्याकरिता शासन स्तरावरून ई- पिक ॲप तयार करण्यात आले. मोबाईलमध्ये हे ॲप डाऊनलोड करून (Farmer) शेतकऱ्यांना स्वतः पिकाची माहिती नोंद करायची असते. शेतकरी स्वतः ॲपच्या माध्यमातून पिकाची नोंद करतात. 

शेतकऱ्यांनी नोंद करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे होऊ शकत नाही. त्यामुळे पिकाची नोंद न झाल्याने आता शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना बराच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. खरीप हंगामातील धानाची नोंद ई -पिक पाहणीच्या माध्यमातून झाली नसल्यामुळे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अँप पुन्हा सुरु करण्याची मागणी 

धान खरेदी केंद्रावर नोंद न झाल्यास शेतकऱ्यांनी धान विकायचा कुठं हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकाची नोंद करण्यासाठी शासन स्तरावरून ई -पिक ॲप सुरू करण्यात यावे अशी मागणी शेतकरी शेतकरी वर्गातून केली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्हाला एकत्र आणायला बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT