Majalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Majalgaon News : मोंढ्यात २ लाख ३८ हजार क्विंटल सोयाबीन खरेदी; गतवर्षीच्या तुलनेत कमी खरेदी

Beed News : गेल्या वर्षी सोयाबीनला खूपच कमी दर मिळाला होता. यामुळे यावर्षी सोयाबीनचा पेरा कमी होईल; असे वाटत होते. मात्र यावर्षी माजलगाव तालुक्यात ३० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा करण्यात आला

विनोद जिरे

बीड : गेल्या वर्षी सोयाबीनला भाव कमी असताना देखील यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा केला होता. त्यामुळे बीडच्या माजलगाव येथील मोंढ्यात व शासकीय खरेदी केंद्रावर मिळून आत्तापर्यंत २ लाख ३८ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली असून यामधून शेतकऱ्यांना ९६ कोटी रुपये मिळाले आहेत. दरम्यान अजूनही चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा आहे. 

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात गेल्या वर्षी २७ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. त्यात सोयाबीनला खूपच कमी दर मिळाला होता. यामुळे यावर्षी सोयाबीनचा पेरा कमी होईल; असे वाटत होते. मात्र यावर्षी माजलगाव तालुक्यात ३० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा करण्यात आला. परिणामी सोयाबीनचे चांगली आवक होऊन बाजार समितीमध्ये खरेदी केली जात आहे. 

तुलनेत भावही कमीच 

गेल्या वर्षी सोयाबीनला जास्तीत जास्त ४ हजार ६५० व कमीत कमी ४ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला होता. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीनचे भाव वाढतील; अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र यंदा देखील गतवर्षी सारखीच परिस्थिती राहिली आहे. सुरवातीपासून आत्तापर्यंत जास्तीत जास्त सोयाबीनला ४ हजार २३५ व कमीत कमी ३ हजार ६०० भाव मिळू शकला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे. 

२ लाख क्विंटलपेक्षा अधिक खरेदी  
यावर्षी माजलगाव येथील मोंढ्यात आत्तापर्यंत २ लाख ३३ हजार ८४९ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. याच्या माध्यमातून ९६ कोटी ५३ लाख ९६ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळू शकले. तर सोयाबीनची शासकीय खरेदी केंद्रावर ४ हजार ८९२ रुपये भावाने सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे. ४ हजार ५०० क्विंटलचे २ कोटी २० लाख १४ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळू शकले आहेत. त्यामुळे आतापर्यंत माजलगावच्या मोंढ्यात व शासकीय खरेदी केंद्रावर मिळून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे व उपसभापती श्रीहरी मोरे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू, निधनाचे वृत्त कळाताच धाकट्याने जागीच सोडलं प्राण; संपूर्ण गावावर शोककळा

SCROLL FOR NEXT