Beed News Saam tv
ऍग्रो वन

Beed News : शेतकऱ्यांचे शेतातच ठिय्या आंदोलन; नुकसान भरपाईची मागणी 

Beed News : खरीप हंगामातील नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नसून आता पुन्हा नुकसानी झालं बसली आहे. यामुळे मदत लवकर मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मांडले आहे

विनोद जिरे

बीड : अवकाळी पावसाने नुकसान केलेल्या पिकाचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी; ही प्रमुख मागणी घेऊन बीडच्या सादोळा गावच्या परिसरात (Farmer) शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी सादोळा शिवारातील शेतामध्येच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. (Latest Marathi News)

मागील महिन्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. बीड जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप हंगामात अपेक्षित उत्पन्न आले नसताना अवकाळीने नुकसान केले आहे. शिवाय खरीप हंगामातील नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नसून आता पुन्हा नुकसानी झालं बसली आहे. यामुळे मदत लवकर मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मांडले आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावे. हरभरा पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक व बियाणांची मदत करावी, शेतकऱ्यांना तात्काळ पिकविम्याची वाटप करावे. या मागण्या घेऊन अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. दरम्यान यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

SCROLL FOR NEXT