Anna Hazare News : राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी बोललं पाहिजे, मग ते कोणत्याही पक्षाचे असो : अण्णा हजारे

Ahmednagar News : नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर म्हणावी तशी चर्चा होत नाही; याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर अण्णा हजारे बोलत होते
Anna Hazare
Anna HazareSaam tv
Published On

सुशील थोरात

राळेगणसिद्धी (अहमदनगर) :  मतांसाठी ज्यावेळेला हिशोब होतो, त्यावेळी राजकीय मंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर जातात. मात्र, आता शेतकरी (Farmer) अडचणीत आहेत; तर राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी बोललं पाहिजे. मग ते कोणत्याही पक्षाचा असो की पार्टीचा असो. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य बाजार भाव मिळाला, तरच कृषी प्रधान भारत शोभून दिसेल. केवळ कृषी प्रधान देश म्हणायचे आणि शेतकऱ्यांच्या पिकांना भाव नाही हे योग्य नाही; असे मतं जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी (Anna Hazare) व्यक्त केलं आहे. (Breaking Marathi News)

Anna Hazare
Ahmednagar News : अध्यक्ष बदलावरून विश्वस्तांमध्ये हाणामारी; मढी देवस्थानच्या बैठकीतील प्रकार

नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर म्हणावी तशी चर्चा होत नाही; याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर अण्णा हजारे बोलत होते. तर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची बदनामी केली म्हणून ऍड. मिलिंद पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना नोटीस पाठवली होती. या नोटिसला आव्हाड यांनी उत्तर दिलं असल्याचे ऍड. पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्विट करत अण्णांमुळे देशाचे वाटोळे झाले, (Ahmednagar) कुणी गांधी टोपी घातली म्हणजे गांधी होत नाही अशा आशयाची पोस्ट केली होती त्यामुळे आव्हाड यांना नोटीस बजावण्यात आली होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Anna Hazare
KDMC News : विकासकाच्या पाच सदनिकांना सील; कर थकबाकीदारांवर केडीएमसीची धडक कारवाई

आव्हाडांच्या उत्तरावर बोलणे टाळले 

नोटिसला आव्हाड यांनी वकिलांमार्फत उत्तर दिलं आहे. ज्यात काही आंदोलनामुळे देशात काही कायदे झाले. जसे माहितीचा अधिकार कायदा झाला त्यात अण्णांचा कोणताही संबंध नाही असं उत्तर दिलं असल्याचे ऍड. पवार यांनी म्हंटले आहे. याबाबत अण्णा हजारे यांना विचारले असता आज माझं वय ८८ वर्ष झालं आहे. अशा अवस्थेत एका तरुणाबद्दल मी काय बोलणार? असं म्हणत अण्णांनी या विषयावर बोलणं टाळलं आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी नोटिशीला जे उत्तर दिलं आहे, त्यामुळेही अण्णांची बदनामीच झाली असल्याचा दावा करत अण्णांचा विचार घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करू असं ऍड मिलिंद पवार यांनी म्हंटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com