Beed News Saam tv
ऍग्रो वन

Beed News : रेशीम उत्पादनाबरोबरच विक्रीसाठीही बीड बाजारपेठ अग्रेसर; दोन महिन्यातच १४ कोटींची विक्री

Beed News : बीडच्या बाजार समितीने सुरू केलेल्या रेशीम खरेदी केंद्रामुळे आता राज्यभरातील शेतकरी या ठिकाणी दाखल होत आहेत.

विनोद जिरे

बीड : कापूस, सोयाबीनसह मका पिकांचे फारशे चांगले उत्पादन यंदा शेतकऱ्याला झाले नाही. यातच कापसाचे दर देखील चांगले नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र बीड जिल्ह्यात रेशीम उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात घेतले जात असून येथे बाजारपेठ उपलब्ध असल्याने रेशीम विक्रीमध्ये देखील बीड जिल्हा अग्रेसर झाला आहे.    

रेशीम उत्पादनात अग्रेसर असलेला (Beed News) बीड जिल्हा आता बाजारपेठेसाठी ही प्रसिद्ध होऊ लागली आहे. बीडच्या बाजार समितीने सुरू केलेल्या रेशीम खरेदी केंद्रामुळे आता राज्यभरातील (Farmer) शेतकरी या ठिकाणी दाखल होत आहेत. रेशीम खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर व्यापारी या ठिकाणी येत असल्याने भाव चांगला मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

यंदा खरीप हंगामात शेतकऱ्याला चांगले उत्पादन मिळाले नाही. इतकेच नाही तर भाव देखील चांगला मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा खर्च देखील निघालेला नाही; असे चित्र सर्वदूर पाहण्यास मिळत आहे. यामुळे काही शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता काही वेगळा प्रयोग करत चांगले उत्पादन घेतले आहे. अशाच प्रकारे बीड जिल्ह्यात रेशीमचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. 

बीड जिल्ह्यात रेशीम विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. यामुळे गत दोन महिन्यात या ठिकाणी १४ कोटी रुपयांच्या रेशीमची विक्री शेतकऱ्यांनी केली. यामुळे शेतकरी आता आर्थिक उन्नतीकडे जात असल्याच पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT