Rabi Crop Saam tv
ऍग्रो वन

Rabi Crops : बीड जिल्ह्यात रब्बीच्या ८६ टक्के पेरण्या; ज्वारी आणि हरभऱ्याचा अधिक पेरा

Beed News : अवकाळी पावसामुळे ज्वारी, हरभरा, कडधान्य आदी पिकांना जीवदान लाभले आहे. तसेच या पावसाच्या ओलीत उर्वरित शेतकऱ्यांनी देखील रब्बी हंगामातील पेरण्या उरकून घेतल्या आहेत

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात रब्बीचा पेरा झाला असून आतापर्यंत तब्बल ८६ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. (Beed) यामध्ये शेतकऱ्यांनी ज्वारी आणि हरभऱ्याला जास्तीची पसंती दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यावर्षी शेतकऱ्यांना (Farmer) ज्वारी, हरभरा ही पिके वगळता इतर पिकांची नाइलाजाने पेरणी करता आलेली नाही. याचा उत्पन्नावर परिणाम होणार आहे. (Latest Marathi News)

यंदा बीड जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असून दुष्काळ आहे. परिणामी विहिरी, बोअरवेल तसेच पाणीसाठे कोरडे पडत आहेत. यामुळे रब्बी हंगामात (Rabi Crops) कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची पेरणी वाढली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ३२ हजार ८८५ एकरवर ज्वारी पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ १ लाख २८ हजार ३८१ एकरवर हरभऱ्याची पेरणी करण्यात आली. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने गव्हाची पेरणी मात्र २० हजार ६६८ हेक्टरवर झाली. तर अवघ्या १४४० हेक्टरवर मक्याची पेरणी झाली आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर केला गेला असून आतापासूनच पाण्याची टंचाई भासत आहे. परंतु १५ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांना काहीसा दिलासा देखील मिळाला आहे. अवकाळी पावसामुळे ज्वारी, हरभरा, कडधान्य आदी पिकांना जीवदान लाभले आहे. तसेच या पावसाच्या ओलीत उर्वरित शेतकऱ्यांनी देखील रब्बी हंगामातील पेरण्या उरकून घेतल्या आहेत. यामध्ये देखील ज्वारी, हरभरा, कडधान्य व मका या पिकांना शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT