मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सासूरवाडीत आलेल्या जावयाने बायकोच्या तसेच सासरकडील मंडळींच्या त्रासाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील बाभळगाव येथे घडली. याप्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात दिंद्रुड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नितीन विनायक शेळके वय 32 रा. लोणी, ता. परतूर जि. जालना असं मयत जावयाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, नितीन शेळके याचा विवाह माजलगाव (Beed News) तालुक्यातील श्रीक्षेत्र बाभळगाव येथील रूपाली रुस्तुम सुरवसे हिच्यासोबत 2020 साली झाला होता.
6 महिन्यांच्या सुखी संसारानंतर पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. पत्नी रुपालीने पती नितीकडे वेगळे राहण्यासाठी तगादा लावला होता. तसेच शेत वाटून घे म्हणून पत्नी व सासरची मंडळी त्याला वारंवार मानसिक त्रास द्यायची.
दरम्यान, दुसऱ्या बाळंतपणासाठी रुपाली माहेरी बाभळगाव येथे आली होती. त्यांची मोठी मुलगी नेहा हिचा वाढदिवस असल्याने नितीन सासरवाडीला आला होता. यावेळी पत्नीने त्याच्याशी किरकोळ कारणावरून वाद घातला.
तसेच त्याला पत्नी रूपाली, सासू आशाबाई रुस्तुम सुरवसे, सासरा रुस्तुम सुरवसे व मेहुणा पवन रुस्तुम सुरवसे यांनी मानसिक त्रास दिला. त्यामुळे नितीनने सासरवाडीतच विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली.
याप्रकरणी नितीनचा भाऊ प्रशांत विनायक शेळके यांच्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळीविरोधात बीडच्या दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Edited by - Satish Daud-Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.