Milk Price Saam tv
ऍग्रो वन

Milk Price decrease : ९ महिन्यांत दूध दरात १५ रुपयांची घसरण; शेतकरी दुहेरी संकटात

विनोद जिरे

बीड : यंदा अगोदरच दुष्काळी परिस्थिती आहे. शिवाय चारा टंचाई..पाणी टंचाई अन यात आता दूध दर घसरल्याने दूध (Milk) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. गेल्या ९ महिन्यात तब्बल १२ ते १५ रुपयांनी दुध दरात कपात झाली असल्याने दुधाळ जनावरे सांभाळायची कशी? असा सवाल शेतकरी (farmer) उपस्थित करत आहेत. (Maharashtra News)

बीड जिल्ह्यात गाय व म्हशीचे मिळून खासगी, सहकारी दूध संघाकडे प्रतिदिवस २ लाख ३५ हजार लिटर दूध संकलित होते. यावर्षी जिल्ह्यात दूध संकलनात प्रथमच वाढ देखील झालेली आहे. परंतु एप्रिलमध्ये ३८ रुपये प्रतिलिटर असणारे दूध, नोव्हेंबरमध्ये २६ रुपयांनी विकण्याची वेळ पशुपालकांवर आल्याने दूध उत्पादक नाराज आहेत. ३:५ फॅट व ८:५ एसएनएफसाठी २६ रुपये प्रतिलिटर दुधाचे दर असले तरी फॅटअभावी शेतकऱ्यांच्या हाती केवळ २४ रुपये पडत असल्याचे दूध उत्पादक सांगत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चारा, खुराकाचे दर वाढले 
दुष्काळामुळे अगोदरच चारा टंचाई, पाणी कमी आहे. यामुळे जनावर सांभाळणे अडचणीचे झाले आहे. तसेच यातून काहीच पदरात पडत नसल्याने कुटुंब जगवायचं कसं? असा प्रश्न दूध उत्पादक पप्पू शिंदे यांनी उपस्थित केला. तर सध्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे वैरण देखील मिळत नाही आणि खुराकाचे दर देखील वाढले आहेत.

त्यामुळे दूधाचा धंदा तोट्यात आहे. दरम्यान गुजरात, गोवा, कर्नाटक व इतर राज्यांत दुधाचे दर ४० रुपयांपेक्षा अधिक आहेत. मात्र महाराष्ट्रातच दूध दराची अशी अवस्था आहे. यामुळं याचा फटका सर्वसामान्य पशुपालकांना बसला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT