Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance : राज्यात १ कोटी ६३ लाख पीकविमा अर्ज दाखल; पिक विमा भरण्याचा आज शेवटचा दिवस

Beed News : आज ३१ जुलै हा विमा भरण्यासाठी अखेरचा दिवस असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी आपला विमा तात्काळ भरून घ्यावा व आपले पीक विमा संरक्षित करावे असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री मुंडे यांनी केले

विनोद जिरे

बीड : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत एक रुपयात पीक विमा ही संकल्पना राज्य सरकारकडून राबविली जात आहे. आज पिक विमा भरण्याचा शेवटचा दिवस असून खरीप हंगाम २०२४ साठी आज सकाळी ११ वाजेपर्यंत १ कोटी ६३ लाख ६० हजारपेक्षा अधिक पीकविमा अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये लाखो शेतकऱ्यांनी एक रुपया विमा सहभाग भरून पिकविमा योजनेत याही वर्षी सहभाग घेतला आहे. 

कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांच्यावर २७ जुलै रोजी मुंबईतील सर एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून ते पुढील उपचार घेत आहेत. दरम्यान रुग्णालयातूनही त्यांच्याकडून कृषी विभागाचा आढावा घेणे सुरूच आहे. पीक विम्यासह विविध योजनांचा आढावा ते सातत्याने घेत आहेत. दरम्यान आज ३१ जुलै हा विमा भरण्यासाठी अखेरचा दिवस असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी आपला विमा तात्काळ भरून घ्यावा व आपले (Crop Insurance) पीक विमा संरक्षित करावे असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री मुंडे यांनी केले आहे. 

विशेष म्हणजे मागील २४ तासात राज्यभरातून तब्बल ५ लाख ७४ हजार शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरला आहे. तर खरीप हंगाम २०२३ मध्ये ७ हजार २८० कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. मागील वर्षीच्या ४ हजार २७१ कोटी पीक विम्याचे वाटप तर आणखी ३००९ कोटींचे वितरण सुरू आहे. शेतकऱ्यांना आता मोफत वीज, कापूस- सोयाबीनला हेक्टरी ५ हजारांचे अनुदानाचा लाभ ८३ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पालघरमध्ये मध्यरात्री अपघाताचा थरार, रुग्णवाहिकेने तिघांना चिरडलं; दोघांचा जागीच मृत्यू

Hit And Run : प्रसिद्ध अभिनेत्रीनं दुचाकीला ठोकलं अन् घटनास्थळावरून पळाली; अपघाताचा व्हिडिओ समोर

Maharashtra Live News Update: मुंबई -गोवा महामार्गावर सलग 5 व्या दिवशी वाहतूक कोंडी, 4 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

Stress Control: सावधान! मध्यरा‍त्रीपर्यंत झोप येत नाही, दररोज जागरण होतेय? तर हा गंभीर आजाराचा धोका

Gulab Jam Recipe: खव्याचा गुलाबजाम बनवण्याची सोपी पद्धत, तोंडात टाकताच विरघळेल

SCROLL FOR NEXT