Beed News Saam tv
ऍग्रो वन

Beed : अवकाळीने सर्व हिरावले; शेतात सडलेल्या टमाट्यांचा लाल चिखल, शेतकऱ्याचे अश्रू अनावर

Beed News : सव्वा एक्करमध्ये सात हजार टोमाॅटोच्या झाडाची लागड करुण एप्रिलमध्ये ठिंबकने पाणी देऊन शेती फुलवली होती. ऐन तोडणीला आलेली बाग अवकाळीने सर्वच शेतात पाणी साचल्याने सर्व टोमॅटोची बाग जळून गेली

Rajesh Sonwane

योगेश काशीद 

बीड : राज्यात मागील आठवड्यापर्यंत अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे होत्याचे नव्हते झाले. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे. अशातच आष्टी तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याचे अवकाळीने सर्व काही हिरावून घेतले असून परिपक्व होऊन पिकलेल्या लाल टोमॅटोंचा लाल चिखल आता शेतात पाहण्यास मिळत आहे. शून्य उत्पादन आल्याने आणि शेतात पडलेला टोमॅटोंचा सडा पाहून शेतकऱ्याचे अश्रू अनावर झाले होते. 

राज्यात अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. आष्टी तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात अवकाळीचा फटका बसल्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आष्टी तालुक्यातील राम गोरख शेळके यांनी सात हजार टोमाॅटोची लागवड केली होती. हि टोमॅटोची शेती अवकाळीमुळे पूर्णपणे खराब झाली आहे. परिणामी बाग उपटून टाकली आहे. 

अवकाळीने सर्व शेती झाली लाल

बीड जिल्ह्यातील आष्टी शहरातील मिस्त्री काम करत शेतकरी राम गोरख शेळके यांनी ऐंशी हजार रुपये खर्च करून टोमॅटोची बाग फुलवली होती. सव्वा एक्करमध्ये सात हजार टोमाॅटोच्या झाडाची लागड करुण एप्रिलमध्ये ठिंबकने पाणी देऊन शेती फुलवली होती. ऐन तोडणीला आलेली बाग अवकाळीने सर्वच शेतात पाणी साचल्याने सर्व टोमॅटोची बाग जळून गेली. आज शेतात सर्वत्र फक्त लालबुंद झालेली टोमॅटो सडून गेलेली आहेत.

आता हातात एक रुपयाही नाही 

यातून जवळपास सात लाख रुपये उत्पन्न टोमॅटोमधून झाले असते. पण आज एकही रुपया पदरात न पडता, उलट हि बाग उपटून टाकण्यासाठी मुजूरांचे पैसे द्यायला देखील नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच शेतीची मशागत कशी करायची, आम्ही कस जगायच हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. माय बाप सरकारने आम्हाला मदत द्यावी, आता निर्सगाने आमची साथ सोडली, माय बाप सरकारने आम्हाला थोडीफार का होईना मदत द्यावी; आशी मागणी शेतकरी राम शेळके यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणेकरांवरील 5 टक्क्यांवरील करवाढ रद्द

Shivneri Fort : शिवनेरीवर शिवजयंती उत्सवाला गालबोट; मध्यरात्री चेंगराचेंगरी, अनेक शिवभक्त जखमी

Success Story: IAS व्हायचं म्हणून गावकऱ्यांनी खिल्ली उडवली, सुलोचना डगमगली नाही; हिम्मतीनं UPSC क्रॅक केली अन् कलेक्टर झाली, वाचा सक्सेस स्टोरी

Muslim Reservation: मुस्लीम समाजाला मोठा धक्का; मुस्लीम आरक्षण फडणवीसांकडून रद्द

Relationship Tips: हे ५ संकेत दिसले तर समजा तुमचा पार्टनर ब्रेक-अप करण्याचा विचार करतोय

SCROLL FOR NEXT