Agro News: सामान्यांसाठी बासमतीचा दरवळ महागला.. - Saam Tv
ऍग्रो वन

Agro News: सामान्यांसाठी बासमतीचा दरवळ महागला..

साम टिव्ही

वाशी : कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर इराण आणि इराक या देशांतील निर्यात खुली झाली आहे. त्यामुळे तांदळाची निर्यात वाढली आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांत विविध प्रकारच्या बासमती तांदळाच्या किमतीत किलोमागे चार ते पाच रुपयांची, तर क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य माणसांसाठी बासमतीचा दरवळ दुष्प्राप्य झला आहे. (Basmati Rice Prices increased due to export)

पंधरा दिवसांत बासमती तांदळाच्या निर्यातीत वाढ झाली आहे. देशांतर्गतही तांदळाचा खप वाढला आहे. त्यातच डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रकचे भाडे १०० ते १५० रुपये प्रतिक्विंटलने वाढले आहेत. त्याचा एकत्रित परिणाम तांदळाच्या दरांवर झाला आहे. कोरोनाचे (Corona) सावट कमी झाल्याने हॉटेल, केटरिंग, कॅन्टीन व्यवसायही पूर्वपदावर येत आहे.

त्यामुळे ११२१ बासमतीला मागणी वाढली आहे. बासमतीसह मध्य प्रदेश आणि गुजरात येथून येणाऱ्या लचकारी कोलमचे दरही गेल्या वर्षीच्या तुलनेत ४०० ते ५०० रुपयांनी वाढले आहेत. त्याचप्रमाणे सुगंधी कालीमूछ व सोनामसुरी या तांदळाच्या दरांत प्रतिक्विंटल २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

पारंपरिक बासमती लागवड कमी
पंजाब, हरयाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश येथील शेतकरी (Farmers) पारंपरिक बासमती तांदळाऐवजी ११२१ बासमती तांदळाच्या लागवडीकडे वळला आहे. पारंपरिक बासमतीची लागवड गेल्या तीन ते चार वर्षांपासून कमी होत चालली आहे. त्यातील ८० टक्के बासमती तांदूळ स्टीम करून निर्यातीसाठी, हॉटेल व केटरिंग आणि संस्थांकडून वापरला जातो.

यामुळे वाढले दर
- यंदा ८ ते १० टक्क्यांनी पेरणी कमी
- परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान
- देशांतर्गत वाढलेली मागणी
- कोरोना घटल्यानंतर निर्यात वाढली
- इंधनदरवाढीमुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ

गेल्या पंधरा दिवसांत बासमती तांदळाच्या दरात ४०० ते ५०० रुपयांची वाढ झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कमी झाल्याने निर्यात सुरळीतपणे झाली आहे. त्यामुळे तांदळाचे दर वाढले आहेत. याचबरोबर यंदा पारंपरिक बासमती तांदळाचेही उत्पादन कमी असल्याने आवकही कमी आहे.
- अजित पटेल, व्यावसायिक.

प्रकार - दर प्रतिकिलो
११२१ बासमती ९० ते १००
साधा बासमती १३० ते १४०
इंद्रायणी ४५ ते ५०
कोलम ५५ ते ६०
कृष्णकमोद ६० ते ६५
रायभोग ४५ ते ५०

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sillod Politics : सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांची एकाहाती सत्तार कोण भेदणार? महाविकास आघाडीकडून कोणाची तयारी? वाचा सविस्तर

Maharashtra News Live Updates: शरद पवार गटात सामील होताच हर्षवर्धन पाटील यांना मोठी जबाबदारी

VIDEO : अजित पवारांचा शिंगणे यांना फोन; नाराजी दूर करण्याचा अजितदादांचा प्रयत्न

Virat Kohli Record : रनमशीन कोहलीचा 'विराट' रेकॉर्ड; थेट तेंडुलकर-गावसकर क्लबमध्ये एन्ट्री

India vs New Zealand : विराट कोहली आणि सरफराजने डाव सावरला; भारताचं जोरदार कमबॅक, न्यूझीलंडकडे १२५ धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT