विश्वभुषण लिमये
सोलापूर : एखादा माणूस अन्नाविना किती दिवस जगू शकतो? तर त्याचे उत्तर २१ दिवस प्रत्येक माणसांचे शरीर ६० टक्के पाण्याने भरलेले आहे. मात्र,गेल्या १४ वर्षांपासुन अन्न न खाणारा अवलिया सोलापूर (Solapur) जिल्ह्यात आहे.
सोलापूर जिल्ह्यातील वडाचीवाडी मधील नागनाथ गोरे असं या शेतकरी अवलियाचे नाव आहे. शरीर संपदा निरोगी राखण्यासाठी आरोग्य दायी श्रेष्ठ पौष्टिक आहार म्हणुन गुळ - शेंगदाणे खात असल्याचे गोरे सांगतात. (Solapur News)
पेशाने शेतकरी असलेले नागनाथ गोरे केवळ शेंगदाणे आणि गुळ इतकच खातायत. वयाच्या ४८ वर्षापासुन ते आजतागायत ६२ व्या वर्षी देखील ते शेंगदाणे गुळ खातायत. एकेदिवशी गोरे घरात बसले असताना त्यांनी शेंगदाणे गुळ सहज एकदा खाल्ले आणि त्यांना सवयच लागली गेली. ती पुढे तशीच आजही कायम राहिलीय.
हे देखील पहा-
गोरे हे गावच्या ग्रामपंचायतचे सदस्य देखील राहिले आहेत. केवळ घरीच नव्हे तर बाहेर लग्न समारंभ असोत की अन्य कार्यक्रम गोरे कार्यक्रमाला हजेरी लावतात. मात्र तिथे ते पाणी देखील पित नाहीत. गोरे शेंगदाणे गुळ इतकच खात असल्याचे अनेकांना माहिती झाले असल्याने गावातील लोक असोत की जवळचे नातेवाईक देखील त्यांना जेवायचा आग्रह धरत नाहीत. ते त्यांना एका प्लेटमध्ये शेंगदाणे गुळ आणुन देतात.
गावातच ते एक मुलगा, सुन, एक नातु यांच्या समवेत कुडाच्या घरात राहताहेत. अन्न न खाणाऱ्या नागनाथ गोरेची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली असुन अनेक जणांना याबाबत कुतूहल निर्माण झालंय. (Solapur News In Marathi)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.