Beauty Tips: या सोप्या टिप्स फॉलो करून Eyebrows करताना होणारा त्रास करा कमी...

आयब्रो हे सौंदर्य वाढवण्यासाठी खूप मदत करतात. परंतु आयब्रो योग्यरित्या बनवणे खूप महत्वाचे आहे. पण आयब्रो करताना होणारा त्रास सहन करणे हा काय लहान मुलांचा खेळ नाही.
Eyebrows
EyebrowsSaam Tv
Published On

आयब्रो हे सौंदर्य वाढवण्यासाठी खूप मदत करतात. परंतु आयब्रो योग्यरित्या बनवणे खूप महत्वाचे आहे. पण आयब्रो करताना होणारा त्रास सहन करणे हा काय लहान मुलांचा खेळ नाही. कारण एक बाजू थोडी जरी खराब झाली तर संपूर्ण लूक खराब होतो. त्याच वेळी, काही महिलांना ते बनवताना इतका वेदना जाणवते की त्या आयब्रो बनवण्यापासून टाळाटाळ करतात. अनेक महिलांना या वेदना सहन होत नाही आणि त्या हात काढून टाकतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे आयब्रो करा, परंतु वेदना होणे हे मात्र अपरिहार्य आहे.

तसे, आयब्रो अनेक पद्धतीने केल्या जातात. यासाठी लोक शेव्हिंग, वॅक्सिंग, प्लकिंग आणि थ्रेडिंगचा वापर करतात. त्यात प्लकिंग आणि थ्रेडिंगचा अधिक वापर केला जातो. या दोन पद्धतींचा अवलंब करताना, तुम्हाला वेदना होऊ नयेत असे वाटत असेल, तर तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता. चला तर मग जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आयब्रो बनवताना होणारा त्रास कमी कसा करायचा.

थ्रेडींग करताना कोणती काळजी घ्यावी?

Threading
ThreadingSaam Tv

1) त्वचा घट्ट पकडा;

थ्रेडिंग करताना वेदना होत असल्यास, त्वचा घट्ट पकडणे आवश्यक आहे. डोळ्याच्या वरच्या आणि खालच्या भागाशी त्वचा घट्ट पकडून ठेवा. असे केल्याने केस सहज बाहेर येतात आणि तुमच्या त्वचेला जास्त इजा होत नाही.

2) त्वचेला आधीच साफ करा;

ज्या भागाचे तुम्हाला केस काढायचे आहेत तो डोळ्याचा भाग घासून साफ करून घ्या. ज्यामुळे तुमचे केस अगदी सहज बाहेर येतील. असे केल्याने त्वचेतील अतिरिक्त तेल निघून जाते. यासोबतच फॉलिकल्सही कमकुवत होतात आणि केस सहज गळतात.

3) बर्फ वापरा;

आयब्रो करण्याच्या आधी त्वचेवर बर्फ फिरवून घ्या. असे केल्याने त्वचा बधीर होते आणि नंतर वेदना खूप कमी होतात. परंतु आता थंडीत बर्फ लावावासा वाटत नसेल तर चेहरा थंड पाण्याने धुवा.

प्लकिंग करताना होणाऱ्या वेदना कश्या कमी कराव्यात?

Eyebrow Plucking
Eyebrow PluckingSaam Tv

1) केसांच्या मुळांपासून सुरुवात करा;

बरेच लोक प्लकिंग करताना केसांचे टोक पकडतात आणि ओढतात, त्यामुळे केस तुटतात. त्यामुळे बारीक केसही उरतात परिणामी पुन्हा वेदना सुरू होतात. अशावेळी केसांच्या मुळापासून केस काढायला सुरुवात करा आणि एका झटक्यात केस काढून टाका.

2) कोल्ड जेल लावून घ्या;

केस थ्रेडींग केल्यानंतर कोल्ड जेल लावा आणि त्या भागाला मॉइश्चरायझ करा. त्या ठिकाणी तुम्ही एलोवेरा जेल वापरू शकता. या सर्व टिप्स तुम्हाला मदत करतील आणि आयब्रो थ्रेडींग करताना तुम्हाला आराम देतील.

3) शॉवर नंतर प्लकिंग;

आंघोळ केल्यानंतर लगेच असे केल्यास केस काढणे सोपे जाते. कारण आंघोळ करताना केसांचे मूळ उघडतात आणि अशा स्थितीत केस सहज बाहेर येतात. शेव्हिंग, वॅक्सिंग, प्लकिंग करण्यापूर्वी गरम पाण्याचा शॉवर केल्याने होणाऱ्या वेदणांपासून काही प्रमाणात आरा देऊ शकते.

Eyebrows
EyebrowsSaam Tv

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com