Fake Fertilizer Saam tv
ऍग्रो वन

Fake Fertilizer Sale : खत विक्रेत्यावर कॉपी राईटचा गुन्हा दाखल; कंपनीचा लोगो वापरून बनावट खत विक्री

Baramati News : कृषी खत निर्मिती प्रलशर बायो प्रोडक्ट प्रा. लि. या कंपनीच्या नोंदणीकृत नावाचा व चिन्हाचा बेकायदेशीर वापरून श्री सिद्धेश्वर कृषी सेवा केंद्र येथे बनावट कृषी खताचा साठा आणि विक्री

मंगेश कचरे

बारामती : खत निर्मित करणाऱ्या कंपनीचा लोगो वापरून बनावट खाताचा साठा आणि विक्री एका कृषी केंद्र चालकांकडून करण्यात येत होता. या प्रकरणी पाटसमधील दुकानदारावर कॉपीराईटचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कृषी केंद्रावर छापा टाकत एक लाखाहून अधिकचा मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. 

कृषी खत निर्मिती प्रलशर बायो प्रोडक्ट प्रा. लि. या कंपनीच्या नोंदणीकृत नावाचा व चिन्हाचा बेकायदेशीर वापरून बारामतीच्या पाटस कुसेगाव रोड लगत असलेल्या श्री सिद्धेश्वर कृषी सेवा केंद्र येथे बनावट कृषी खताचा साठा आणि विक्री करण्यात येत होती. याबाबत कंपनीला माहिती मिळाल्यानंतर प्रलशर बायो प्रोडक्ट प्रा. लि. कंपनीचे विक्री अधिकारी वसंत पांडुरंग गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून यवत पोलीस ठाण्यात गुरुवार (१९ डिसेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कृषी खत निर्मिती प्रलशर बायो प्रोडक्ट प्रा. लि. कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाटस हद्दीत कंपनीचे प्रोडक्ट असलेले प्लॅन्टो नावाची बनावट खते विकली जात आहेत. यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बनावट खतांचा साठा व विक्री होत असल्याची माहिती पाटस पोलीसांना दिली. पोलिसांसोबत पाटस हद्दीतील कुसेगाव मार्गावरील भानोबा विद्यालयाच्या शेजारी असलेल्या श्री. सिध्देश्वर कृषी सेवा केंद्र केंद्रावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्या दुकानातील खतांची तपासणी केली. 

१ लाख १७ हजाराचा मुद्देमाल हस्तगत 

सदरच्या कृषी केंद्रावर प्रलशर बायो प्रोडक्ट कंपनीने उत्पादन न केलेल्या परंतु कंपनीचे प्रोडक्ट प्लॅन्टो नावाचा वापर केलेल्या खताच्या पिशव्या असल्याचे आढळून आल्या. न्यू प्लॅन्टो प्लस नावाच्या ५० किलो वजनाच्या प्रत्येकी एक हजार रुपये किंमतीच्या ४८ पिशव्या तसेच २५ किलो वजनाच्या प्रत्येकी ५०० रूपये किंमतीच्या १३८ पिशव्या असा एकूण १ लाख १७ रुपयांचा खताच्या पिशव्या बनावट असल्याच्या आढळल्या. अधिक तपास पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख करीत आहेत.

जीएसटीने खतांची खरेदी
तसेच पोलिसांनी बनावट खतांच्या सर्व पिशव्या जप्त करून ताब्यात घेतला आहेत. बनावट खत निर्मिती करून ग्राहकांची फसवणूक व कंपनीची फसवणूक करण्याच्या हेतूने बनावट खतांची विक्री व साठवून करून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या केंद्र चालकाने जीएसटीने खतांची खरेदी केली असल्याचे समोर येत आहे. तपासासाठी आरोपीला नोटीस दिली असून लवकरच गुन्ह्याचा उलघडा करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priya Marathe : प्रिया मराठे यांची शेवटची पोस्ट व्हायरल, नवऱ्यासाठी लिहिला होता खास मेसेज

Sambhajinagar : दोन जिवलग मित्रांचा करुण अंत; जनावरे चारताना तलावात पोहण्यासाठी उतरले असता बुडाले

Dengue symptoms neurological: डेंग्यूची लक्षणं हलक्यात घेऊ नका; मेंदूशी संबंधित गुंतागुंती वाढू शकतात, डॉक्टरांचा इशारा

'तो तरूण तुम्हाला बघून हस्तमैथुन..' लोकलमध्ये तरूणीच्या बाजूला बसून घाणेरडं कृत्य, नंतर जे घडलं ते भयंकर

Manoj Jarange Patil Protest Live Updates : शरद पवार दुपारी ३ वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होणार

SCROLL FOR NEXT