पंढरपूर - ठिबक संच विक्रेत्याच्या साथीने एका बॅंक अधिकाऱ्याने पंढरपूर (Pandharpur) व माळशिरस तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या नावे ठिबक संच खरेदीची बोगस कर्ज प्रकरणे करुन कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधीत बॅंक अअधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अशी लेखी तक्रार रयत क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष राहुल बिडवे व शेतकऱ्यांनी (Farmer) अकूलजचे (Akluj) उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे केली आहे.
शेतकऱ्यांना थकबाकी भरण्याच्या नोटीसा आल्यानंतर हा फसवणूकीचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान संबधीत दोषी अधिकाऱ्यासह इतरांवर कारवाई करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या दारात बोंबाबोंब आंदोलन केले. माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथे बॅंक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. 2014 ते 2017 दरम्यानच्या तत्कालीन शाखा अधिकारी जाफर अहमद सय्यद यांनी श्रीपूर येथील ठिबक संच विक्रेता राहुल पांढरे यांच्या मदतीने पंढरपूर तालुक्यातील नांदोरे,नेमतवाडी,पेहे,माळशिरस तालुक्यातील जांबूड, पेहे, नेवरे यासह इतर अनेक गावातील सुमारे 100 हून अधिक शेतकऱ्यांच्या नावे ठिबस सिंचन संच खरेदीची बोगस कर्ज प्रकरणे करुन जवळपास अडीच ते तीन कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हे देखील पहा -
तब्बल पाच वर्षानंतर बॅंकेने थकीत कर्जाची रक्कम वसुलीसाठी नोटीस दिल्यानंतर या शेतकऱ्यांना धक्का बसला आहे. यामध्ये पंढरपूर तालुक्यातील नांदोरे येथील रामचंद्र वाघ, हरी वाघ, उषा वाघ, प्रभू वाघ तर नेमतवाडी येथील धुळा वाघमोडे, तुकाराम चव्हाण,प्रल्हाद चव्हाण यांच्यासह माळशिरस तालुक्यातील जांबूड येथील त्र्यंबक भुसनर, मंगल भुसनर, साळुबाई खाडमोडे या शेतकऱ्यांच्या नावे ठिकब संच खरेदीसह लाखो रुपयांची बोगस पीक कर्जे काढली आहेत. अशा अनेक शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज प्रकरणे केल्याची प्राथमिक माहिती आहे.
नियमीत कर्जदार असलेले हे सर्व शेतकरी आता थककबादीर झाले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता कोणतीच बॅंक पिक कर्ज देत नाही. याप्रकारामुळे हे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.संबंधीत बॅंकेचे अधिकारी व त्यांना साथ देणार्या सर्वांची चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी रामचंद्र नारायण वाघ या शेतकर्यांने केली आहे. अन्यथा बॅंकेच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा येथील राष्ट्रवादीचे नेते सुमीत भोसले यांनी दिला आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.