शाळेत शिकवली जाणार भगवद् गीता, गुजरात सरकारचा मोठा निर्णय

नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत आता राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता सहावी ते बारावीच्या मुलांना श्रीमद्भगवद् गीताचे तत्त्वे आणि मूल्ये शिकवली जाणार आहेत.
Bhagavad Gita
Bhagavad GitaSaam Tv

गुजरात - श्रीमद भगवद् गीता सार हा गुजरातच्या शाळांमधील इयत्ता सहावी ते बारावीच्या अभ्यासक्रमाचा भाग बनवला जाईल. गुजरात सरकारने (Gujarat Government) गुरुवारी जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणात ही घोषणा करण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत आता राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता सहावी ते बारावीच्या मुलांना श्रीमद्भगवद् गीताचे (Bhagavad Gita) तत्त्वे आणि मूल्ये शिकवली जाणार आहेत.

हे देखील पहा -

शालेय मुलांना गीता आणि त्यातील मूल्यांची माहिती व्हावी, यासाठी प्रार्थना, श्लोक, नाटक, प्रश्नमंजुषा, चित्रकला, वक्तृत्व अशा स्पर्धांच्या माध्यमातून देखील श्रीमद्भगवद् गीतेचं शिक्षण दिलं जाईल, असं गुजरात सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यात विधानसभा निवडणुका होणार असताना गुजरात सरकारने शाळांमध्ये श्रीमद्भगवद् गीता शिकवण्याची घोषणा केली आहे.

सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमांमध्ये श्रीमद्भगवद् गीतेतील पाठ सर्वांगी शिक्षण पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक भाषेमधून गोष्टीच्या स्वरूपात श्रीमद्भगवद् गीता समाविष्ट करण्यात येणार आहे.

Bhagavad Gita
लग्नासाठी तरुणीला इम्प्रेस करणाऱ्या तोतया पीएसआयला बेड्या

नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकतात

गुजरात विधानसभेच्या निवडणुका या वर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील विद्यमान सरकारचा कार्यकाळ18 फेब्रुवारी 2023 रोजी संपणार आहे. राज्यात सध्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. राज्यात विधानसभेच्या 182 जागा आहेत आणि विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा पक्षांच्या युतीला बहुमताचा आकडा गाठणे आवश्यक आहे. जे राज्यात 92 आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com