लग्नासाठी तरुणीला इम्प्रेस करणाऱ्या तोतया पीएसआयला बेड्या

लग्नासाठी उपवर झालेल्या तरुणी आणि त्यांच्या आई वडीलांसाठी महत्वाची बातमी
Pandharpur Police Station
Pandharpur Police Station भारत नागणे
Published On

पंढरपूर - लग्नासाठी एका तरुणीला इम्प्रेस करणार्या तोतया पीएसआयला पोलिसांनी (Police) बेड्या ठोकल्या आहेत. मंगळवेढा येथील रमेश भोसले असं या तोतयागिरी करणाऱ्या या भामट्याचे नाव आहे. लग्नासाठी गुडघ्याला बाशिंग‌‌ बांधून तयार असलेले तरुण प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणींना कसं फसवतील याचा सध्या नेम नाही. अशाच एका भामट्याने स्वतः पीएसआय आणि वडील आयपीएस (PSI)अधिकारी असल्याची बतावणी करुन पंढरपुरातील (Pandharpur) एका तरुणीला लग्नासाठी जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला.

हे देखील पहा -

परंतु तरुणीच्या आणि तीच्या नातेवाईकांच्या संतर्कतेमुळे तोतया पीएसआय रमेश भोसलेचा हा प्रयत्न फसला आणि त्याच्या हातात बेड्या पडल्या. पंढरपुरातील एक तरुणी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होती. याच दरम्यान आरोपी रमेश भोसले याची तिच्याशी ओळख झाली.ओळखीनंतर त्याने तरुणीशी आणि तीच्या आई वडीलांशी सलगी वाढवली. मी पीएसआय असून मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे त्याने सांगितले. त्यावर तरुणीनेही काही दिवस विश्वास ठेवला. त्यातून त्याने पिडीत तरुणीशी अधिक मैत्री वाढवल्याने तिच्याकडे व घरच्या लोकांकडे लग्नासाठी तगादा लावला होता.

Pandharpur Police Station
मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाची आणि भेदभावाची होळी

त्यावरुन पिडीत तरुणीला आरोपी विषयी संशय आल्याने तीने व तिच्या आई वडीलांनी मंगळवेढा व पंढरपूर पोलीस ठाण्यात चौकशी केली असता, या नावाचा कोणीही पोलिस अधिकारी नसल्याचे समोर आले. त्यानंतर पीडित तरुणीने निर्भया पथकाला ही माहिती दिली. त्यावरुन पोलिसांनी सापळा रचून आरोपी रमेश भोसलेला पकडले. त्याच्याकडून पोलीस दलाचा खाकी गणवेश, टोपी, बेल्ट, आणि मुंबई पोलीस नावाने तयार केलेले बनावट ओळख पत्र असा ऐवज जप्त केला आहे. तोतयागिरी करुन तरुणीची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी रमेश भोसले याच्याविरोधात पंढरपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याला न्यायालयापुढे हजर केले असता. पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com