Amravati News Saam tv
ऍग्रो वन

Amravati : दोन दिवसात १७६ हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान; अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा फटका, केळीचे सर्वाधिक नुकसान

Amravati News : राज्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले होते. हे नुकसान संपत नाही तोच अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: मॉन्सूनचा दमदार पाऊस होण्यापूर्वी राज्यात वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन होत आहे. वादळी वाऱ्यामुळे शेतातील पिकांचे मोट्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरम्यान १२ व १३ जून रोजी या दोन दिवसांमध्ये अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या तब्बल १७६ हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केला आहे, 

राज्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले होते. हे नुकसान संपत नाही तोच अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. जोरदार वारा असल्यामुळे सध्या शेतात उभ्या असलेल्या फळ बागांना याचा फटका बसत आहे. अमरावती जिल्ह्यात देखील दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. 

नुकसानीचा अहवाल शासनाकडे 

सर्वाधिक केळी पिकांचे नुकसान झालं असून खरीप हंगामाच्या तोंडावर बळीराजा अडचणीत सापडला आहे. यावर्षी अवकाळी व मान्सूनपूर्व पावसाचा मोठा फटका अमरावती मधील शेतकऱ्यांना बसला आहे. कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या शेती पिकांचा पंचनामा करून अहवाल राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्यामुळे लवकरात लवकर नुकसान भरपाई सरकारने द्यावी; अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची उसंत 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. गेले चार दिवस कोसळणाऱ्या पावसाने सकाळपासून उघडीप घेतली आहे. सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र ऊन आणि काही प्रमाणात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात १२.८७ सरासरी पाऊस झाला असून वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक २४ मिमी पाऊस झाला आहे. तर सर्वात कमी मालवण तालुक्यात ५ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. आज जिल्ह्याला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असला तरी सकाळपासूनच जिल्ह्यात ऊन पडलेल पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट, पुढी तीन तास धो धो कोसळणार

RO-RO Service : 'या' कारणामुळे कोकण रेल्वेची रो-रो सेवा चाकरमान्यांसाठी 'निरुपयोगी'? | VIDEO

Pune Water : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' भागातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात मोठा बदल, वाचा कधी कुठे येणार पाणी

UPI Charges: आता फुकटात यूपीआय पेमेंट बंद, पैसे मोजावे लागणार; RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे संकेत

Karjat Tourism : पहिल्यांदाच ट्रेकिंगला जाताय? कर्जतमधील 'हा' किल्ला ठरेल बेस्ट

SCROLL FOR NEXT