Amarawati News Saam tv
ऍग्रो वन

Amravati News: अमरावती जिल्ह्यात अजूनही पावसाची प्रतिक्षा; पिकांना वाचवण्यासाठी तुषार सिंचनाद्वारे पाणी

अमरावती जिल्ह्यात अजूनही पावसाची प्रतिक्षा; पिकांना वाचवण्यासाठी तुषार सिंचनाद्वारे पाणी

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

अमरावती : यावर्षी राज्यासह अमरावती जिल्ह्यामध्ये मान्सून उशिराने दाखल झाला. या दरम्‍यान काही शेतकऱ्यांनी (Farmer) पेरणी केली आहे. परंतु, आता राज्‍यातील काही भागात (Rain) पाऊस पडत असताना अमरावती (Amaravati) जिल्‍ह्यात अजूनही पावसाची प्रतिक्षा आहे. यामुळे पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना पेरणी पिकांना पाणी देण्याची वेळ आली आहे. (Live Marathi News)

राज्‍यासह अमरावती जिल्‍ह्यात पावसाचे आगमन उशिराने झाले. या दरम्‍यान शेतकऱ्यांनी पेरणीला घाई केली. लाखो रुपये खर्च करून खते, बी बियाणे आणून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी केली. बियाण्याला अंकुरही फुटले. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर तुषार सिंचनाने पाणी देण्याची वेळ आली आहे.

१०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये; असं कृषी विभागाने सांगितलं होते. मात्र अमरावती जिल्ह्यात ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पण आधीच मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांनी घाईघाईत पेरणी केली. मात्र आता पावसाने दडी मारल्याणारे शेतकऱ्यावर संकट ओढावले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सिनेमात रोल देण्याचं आमिष अन् भयानक कृत्य! २० वर्षांच्या तरुणीसोबत घडला हादरवणारा प्रकार; मुंबईतील 'त्या' गायकाचा खरा चेहरा समोर

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

Krishna Mahabharata: महाभारतात श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या युद्धात शस्त्र न उचलण्याचा निर्णय का घेतला होता?

Accident : अंत्यविधीला जाताना कार अन् ट्रकची भीषण धडक, ५ जणांचा मृत्यू; अपघाताने एका क्षणात सर्व काही संपलं...

Helicopter Crash: उड्डाण घेताच काही मिनिटांत हेलिकॉप्टर कोसळलं, ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT