Amravati News  Saam tv
ऍग्रो वन

Amravati News : तापमान वाढीमुळे संत्रा पडतोय गळून; अमरावती जिल्ह्यातील संत्रा बागांना मोठा फटका

Amravati News : राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. विदर्भ, मराठवाडा. उत्तर महाराष्ट्रात उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यातील तापमान देखील ४४ अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: विदर्भात एकीकडे सूर्य आग ओकत आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम जनजीवनावर होताना दिसत आहे. मात्र या वाढलेल्या तापमानाचा फटका संत्रा बागांना बसण्यास सुरवात झाली आहे. अमरावतीतील तापमान वाढीमुळे झाडावरील संत्रा गळून पडत आहेत. यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. 

राज्यात (Heat Wave) उष्णतेची लाट पसरली आहे. विदर्भ, मराठवाडा. उत्तर महाराष्ट्रात उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे. दरम्यान (Amravati) अमरावती जिल्ह्यातील तापमान देखील ४४ अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. या वाढत्या तापमानाचा फटका अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. वाढत्या तापमानामुळे बहारातील लहान संत्र मोठ्या प्रमाणात गळायला सुरवात झल्याने संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड, चांदूरबाजार या भागात मोठ्या प्रमाणात संत्राचे उत्पादन घेतले जाते. मात्र यावर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. त्यावेळी सुद्धा संत्र्याची गळणं झाली होती. आता वाढत्या (Temperature) तापमानामूळे झाडावर असलेले संत्रा गळून पडत आहे, सोबतच झाडाची पानं सुद्धा सुकत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते असून शेतकरी हवालदिल झाला आहे. या संत्रा गळतीचे पंचनामे करून मदत द्यावी; अशी मागणी शेतकरी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

Crime: १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, जबरदस्ती दारू पाजली नंतर चौघांनी...

SCROLL FOR NEXT