Bogus Seeds  Saam tv
ऍग्रो वन

Bogus Seeds : अमरावती जिल्ह्यत १ लाख ३२ हजाराचे कपाशीचे बोगस बियाणे पकडले; दोघांना अटक

Amravati News : खरीप हंगाम तोंडावर असताना अनेक शेतकरी मान्सूनपूर्व लागवड करण्यास लागला आहे. यामुळे कृषी केंद्रावर बियाणे खरेदी करण्यास शेतकऱ्यांची गर्दी होत आहे

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : सध्या खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरु असून बाजार कापसासह सर्व बियाणे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. मात्र काही विक्रेत्यांकडून बोगस बियाणे विक्री केली जात असते. अशाच प्रकारे अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात बोगस बियाणे आढळून आले असून कृषी विभाग व स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. 

खरीप हंगाम तोंडावर असताना अनेक शेतकरी मान्सूनपूर्व लागवड करण्यास लागला आहे. यामुळे कृषी केंद्रावर बियाणे खरेदी करण्यास शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. दरम्यान बोगस बियाणे व जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कृषी विभागाची नजर आहे. दरम्यान बोगस बियाणे वाहतूक केली जात असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार (Amravati) अमरावती- नागपूर महामार्गावर शेंदोळाजवळ कपाशीचे बोगस बियाणे वाहतूक करताना हि कारवाई करण्यात आली आहे. 

दोन जणांना घेतले ताब्यात 
कृषी विभाग व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तपणे हि कारवाई केली असून साधारण १ लाख ३२ हजार रुपये किमतीचे बोगस बियाणांचे पाकीट जप्त करण्यात आले आहे. तर या कारवाईत दोन जणांना तिवसा पोलिसांनी अटक केली असून यामध्ये लिंक असलेल्या आरोपीचा तिवसा पोलीस शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज ठाकरेंचा १९ ऑक्टोबर रोजी मेळावा

Diwali 2025: या 5 राशींची दिवाळी होणार धुम-धडाक्यात, माता लक्ष्मीची असणार विशेष कृपा

Shocking: इंदुरमध्ये सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न, २८ तृतीयपंथीयांनी प्यायले फिनाइल; नेमकं कारण काय?

Diwali Offer: १ रुपयात अनलिमिटेड कॉल अन् दररोज 2GBडेटा, दिवाळीची बंपर ऑफर

Actress Scandel: दिवाळी पार्टीमध्ये अभिनेत्रीचा सुटला ताबा; खुल्लम खुल्ला पतीसोबत केला लिप लॉक, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT