Crop Insurance : धाराशिव जिल्ह्यातील ५ लाख १९ हजार शेतकरी पीक विम्यापासून राहणार वंचित; ठाकरे गट आक्रमक

Dharashiv News : केंद्र सरकारच्या ३० एप्रिलच्या नवीन परीपत्रकामुळे शेतकरी खरीप २०२३ च्या विम्यापासुन वंचित राहणार आहेत.
Crop Insurance
Crop InsuranceSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: केंद्र सरकारने ३० एप्रिल २०२४ ला काढलेल्या जाचक परिपत्रकामुळे राज्यासह धाराशिव जिल्ह्यातील ३२ महसुल मंडळातील शेतकरी खरीप २०२३ च्या विम्यापासुन वंचित राहणार आहेत. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील ५ लाख ५६ हजार शेतकऱ्यांपैकी ३७ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. उर्वरित ५ लाख १९ हजार शेतकरी मदतीपासुन वंचित राहणार आहे.

Crop Insurance
Sindhudurg News : कोकण किनारपट्टीवर १ जूनपासून दोन महिने मासेमारीस बंदी; मत्स्य व्यवसाय विभागाचे आदेश 

केंद्र सरकारच्या ३० एप्रिलच्या नवीन परीपत्रकामुळे शेतकरी खरीप २०२३ च्या विम्यापासुन वंचित राहणार आहेत. राज्यासह (Dharashiv news) धाराशिव जिल्ह्यातील ३२ महसुल मंडळातील शेतकरी (farmer) खरीप २०२३ च्या विम्यापासुन वंचित राहणार आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला ठाकरे गटाच्या खासदार व आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 

Crop Insurance
Nandurbar News : पाणी नसल्यामुळे पिके वाया जाण्याच्या स्थितीत; शेतीपंपासाठी विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने शेतकरी आक्रमक

खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी केंद्र सरकारच्या या धोरणाचा निषेध व्यक्त करत शेतकऱ्यांसाठी कायदेशीर व रस्त्यांवरील लढाई लढण्याचा इशारा दिला आहे. तसेच भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर देखील (Crop Insurance) पिकविम्यावर जोरदार हल्लाबोल केला. तर आमदार कैलास पाटील यांनी देखील पीक विम्याच्या नवीन धोरणांच्या परिपत्रकाचा निषेध करत वेळप्रसंगी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा पत्रकार परिषद घेत दिला आहे. त्यामुळे पिकविम्यावरुन धाराशिवमध्ये ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com